बुधवार, 29 नोव्हेंबर 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (12:45 IST)

अंक ज्योतिष : मूलांक 1 भविष्यफळ 2021

मूलांक 1 
ज्यांचा जन्म अंक 1, 10, 19 आणि 28 तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक 1 असतो. हे लोक सूर्याच्या प्रभावाखाली असतात. या लोकांच्या आयुष्यात नेतृत्व महत्त्वाचे आणि ऊर्जा देणारे असतात. हे आपल्या कामाच्या आणि नात्याच्या प्रति महत्त्वाकांक्षी असतात. या अंकाच्या लोकांना कोणाच्या दबावाखाली काम करणे अजिबात आवडत नाही. हे स्वतःच मालक किंवा बॉस असतात. आपल्या साठी वर्ष 2021 ज्याचा स्वामी बुध आहे आणि मूलांक 5 आहे च्या मुळे हे वर्ष आव्हानात्मक असेल. बरेच कष्ट केल्यावर आणि संघर्ष केल्यावर यश नक्की मिळेल. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन करून दाखवाल. आपण आपल्या कुटुंबासह आणि जवळच्या नातातलगांसह प्रेमाने आयुष्य जगाल. 
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
मूलांक 1 च्या लोकांसाठी वर्ष 2021 कामासाठी संघर्षाने भरलेले असेल. पण आपले श्रम कामी येतील त्याचे फळ आपल्याला या वर्षाच्या मध्यकाळातच दिसेल. या वर्षाचा मूळ अंक 5 आहे, ज्याचा स्वामी बुध आहे. आपले मूलांक 1 सूर्याच्या प्रभावाखाली आहे म्हणून हे वर्ष कोणत्याही कामाची पर्वा न करता कामासाठी प्रवृत्त करेल. हे वर्ष नव्या कामासाठी चांगले असेल. आपले नवीन लोकांशी संपर्क होतील. या मुळे आपल्याला फायद्यासह आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची संधी मिळेल. नोकरदार वर्गाला वर्षाच्या सुरुवातीस पदोन्नतीसाठी सुवर्ण संधी घेऊन येईल. नोकरीच्या क्षेत्रात एप्रिल आणि ऑगस्टच्या महिन्यात अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
 
आर्थिक दृष्ट्या कसे असणार हे वर्ष 2021 : 
2021 चे वर्ष मूलांक 1 च्या लोकांसाठी पैशांचा बाबतीत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असेल. या वर्षी आपण फिरण्यात आणि आपल्या करमणुकीवर अधिक खर्च कराल आणि हे 5 अंकाचे वर्ष आपल्याला नव्या-नव्या मार्गाने धनप्राप्ती करवून देईल. या वर्षी शिक्षा आणि प्रवासाच्याद्वारे देखील पैसे येतील. व्यावसायिकांसाठी आणि वित्ताच्या कामात देखील फायदे मिळतील. जर आपण एखाद्या रिअल इस्टेट किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे कमावू इच्छिता तर मार्च, मे, जून, ऑक्टोबर आणि डिसेंबर महिने चांगले असतील.
 
प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनासाठी कसे असणार हे वर्ष 2021:  
मूलांक 1 च्या लोकांना हे वर्ष खूपच रोमँटिक असेल कारण आपण आपल्या जोडीदाराकडून ज्याची अपेक्षा बाळगत होता ते आपल्याला मिळेल. आपण आपल्या जोडीदारासह फिरण्यात आणि प्रेम करण्यात वेळ घालवाल. आपण आपल्या कुटुंबाच्या लोकांशी प्रेमाने वागा कारण आपला अहंकार आपले नुकसान करू शकतो. विवाहित लोकांसाठी हे वर्ष त्यांच्या आयुष्यात नव्या मित्राची चाहूल घेऊन येत आहे ज्यामुळे घराच्या बाहेर देखील नवं नातं निर्माण होईल. आपले जोडीदार आपला साथ देत नसल्यामुळे आपण बाहेर भटकू शकता. वर्षाच्या अखेरीस आपले वैवाहिक जीवन आनंदी असेल. अविवाहित लोकांसाठी हे वर्ष विवाहासाठी अनुकूल राहील.
  
आरोग्यासाठी कसे असणार हे वर्ष 2021: 
मूलांक 1 च्या लोकांसाठी हे वर्ष चांगले असेल. पण आपण खाण्या-पिण्या कडे लक्ष देत नसाल तर पोटाच्या तक्रारी होतील.अधिक मद्यपान करीत असाल ते देखील आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरेल. आपल्याला डोक्याचे किंवा डोळ्याचे काही त्रास असल्यास काळजी घ्या.काही त्रास जाणवत असल्यास त्वरितच वेळेत उपचार करा. हे वर्ष जानेवारी, एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यात वाहन अपघात होऊ शकतात, वेगाने वाहन चालवू नका. रागाच्या भरात घरातून बाहेर पडू नका.