शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (18:11 IST)

धनु राशी भविष्य 2021

जाणून घेऊ या की येणारे वर्ष 2021 धनु राशी साठी रोमांस, धन, करिअर आणि आरोग्यासाठी कसे असेल. धनु राशीच्या लोकांना हे वर्ष 2021 खूपच उत्कृष्ट ठरणारे आहे. हे वर्ष आपल्यासाठी  मजा, आनंद आणि शांतीचे क्षण घेऊन येणारे आहे . या वर्षात आपल्याला ते सर्व काही मिळेल जे आपल्याला पाहिजेत. या वर्षी आपली ओंजळी आनंदाने भरणारी राहील. प्रवास घडतील.पैसे मिळतील. करिअर मध्ये देखील ग्रहमान उच्च राहतील.व्यवसायात देखील चांगले होईल.कोर्टाचे निकाल आपल्या पक्षात लागतील. विरोधी परास्त होतील. बारीक कुरबुरी मधून मधून त्रास देतील. एकंदरीत हे वर्ष जोरदार जाईल असे दिसत आहे. ग्रहांची स्थिती सांगत आहे की आपल्या मधील धैर्यता आणि धाडसी वृत्ती बऱ्याच वेळा जिंकवेल. आपल्यात आध्यात्मिक वृत्ती वाढून आपण बऱ्याच धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 
 
कामात आपले मन लागेल. या वर्षी आपण तीर्थक्षेत्री देखील जाऊ शकता.गुडघे आपल्याला त्रास देतील. 
या वर्षी 2021 मध्ये  या राशीच्या लोकांना जंगम आणि स्थावर मालमत्तेचा लाभ मिळेल. पदोन्नतीसह वर्चस्वात देखील वाढ होईल. या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व नव्याने उजळून निघेल कारण त्यांना सर्व बाजूने 
 
यशाची प्राप्ती होईल जी ह्यांच्यामध्ये एक नवा आत्मविश्वास वाढवेल. मिळालेल्या यशामुळे विरोधकांवर परिणाम होईल.या वर्षी मानसन्मान मिळेल काही पुरस्कार आणि अवॉर्ड आश्चर्यकारक परिणाम देतील. पैसे मिळतील पण खर्च पण होतील. एकंदरीत हे वर्ष या राशीच्या लोकांसाठी उजाळणारा आणि आनंदाने भरलेला असेल.

धनु राशीच्या विद्यार्थ्यांसाठी 2021 ची सुरुवात दमदार असेल, चांगले निकाल मिळतील. ज्यांना परदेशगमनाची इच्छा असेल त्यांना या वर्षी काही अडचणींना सामोरी जावे लागेल, पण वर्षाच्या अखेरीस चांगले योग जुळून येतील आणि परदेशवारी देखील आरामात होईल.
 
रोमांस साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
धनु राशीच्या लोकांसाठी वर्ष 2021 रोमान्सच्या दृष्टीने खूप चांगले असेल. प्रेम वाढेल. या वर्षात आपण एकमेकांच्या जवळ याल. आपले नाते दृढ होतील.जर आपण जोडीदाराच्या शोधात आहात तर या वर्षी शोध संपेल. प्रेमात असाल तर नात्यात गोडवा टिकून राहील.विवाहासाठी योग कमकुवत असल्याने थोडाकाळ थांबावे लागेल. या वर्षी ग्रहांची स्थिती आपल्या पक्षात आहे म्हणून नात्यांना दृढ करा. विवाहित असाल तर आयुष्य चांगले जाईल. आपसातील सामंजस्यता वाढेल आणि या नात्याशी निगडित जबाबदाऱ्या व्यवस्थितरीत्या पार पाडाल.
 
आर्थिक व्यवहारासाठी कसे असणार हे वर्ष 2021 
धनु राशीच्या लोकांना हे वर्ष 2021 आर्थिक उत्पन्नात बढतीचे असेल. गमावलेले पैसे मिळतील म्हणजे अडकलेले पैसे मिळतील. या मुळे आपल्याला आर्थिक निर्णय घेण्यास मोठा फायदा होईल.2021 च्या सुरुवातीला वडिलांकडून मालमत्ता मिळेल. सुरुवातीचे दोन महिने अनुकूल असतील.त्यानंतर वर्षभर धनागमनाचे नवे मार्ग उघडतील.ऑगस्ट मध्ये खर्च वाढतील पण त्याचा परिणाम आपल्या बँक खात्यावर होणार नाही. या वर्षात आपण घर आणि कार सारखी मोठी खरेदी करू शकाल जे आपल्याला भविष्यासाठी फायदा करतील. धनू रास ही पैशांच्या बाबतीत गंभीर राशी मानली जाते. हेच कारण आहे की या राशीच्या लोकांचे पैशाचे व्यवस्थापन खूप व्यवस्थित असतात.हे लोक पैशाचा गैरवापर सहन करू शकत नाही. पण स्वतःवर खर्च करण्यात देखील मागे बघत नाही. पैशांच्या बाबतीत हे वर्ष खूप चांगले जाणार आहे.
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
या राशीच्या लोकांसाठी  वर्ष 2021ची सुरुवात मनाप्रमाणे राहणारी असेल. आपल्याला कामाचे चांगले फळ मिळतील. आदर देखील मिळेल. मे-जून च्या दरम्यान आणि नंतर ऑगस्ट मध्ये थोडी सावधगिरी बाळगा, कारण या काळात नोकरीत काही अडचणी येण्याची शक्यता आहे. आपण धाडसी आहात हे वर्ष त्या मुळेच चांगले जाणार आहे. जर आपण एखादे व्यवसाय करू इच्छिता तर 2021 ची सुरुवात चांगली असेल. व्यवसाय वाढविण्यात भागीदार मदत करतील. वर्षांच्या सुरुवातीला भांडवल गुंतवू नका. हे हानिकारक असू शकत. लहान व्यावसायिकांना हे वर्ष आशेची किरण बनून येत आहे.आपले काम वेगाने होतील. मोठे व्यवसायी देखील या वर्षात आनंदी राहतील काही चांगले सौदे त्यांना फायदा देतील.  
 
आरोग्यासाठी कसे असणार वर्ष 2021 :
आरोग्याच्या दृष्टीने या वर्षाची सुरुवात थोडी कमकुवत असेल.आपल्याला  तीन दुखणे संभवतात एक गुडघे दुखीचा त्रास,दुसरं श्वासाचा त्रास आणि तिसरं सततचा खोकला. असंतुलित खाणं आणि अनियमित दिनचर्या आरोग्याला खराब करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. वर्षाचा मध्यकाळात डोळ्याशी निगडित काही त्रास उद्भवतील.धनु राशींच्या लोकांसाठी 2021 आरोग्याच्या दृष्टीने सरासरीपेक्षा किंचित चांगले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे अशी की या वर्षी आपण कोणत्याही मोठ्या समस्येला बळी पडणार नाही.वर्षान्तचा काळ चांगला राहील. या राशीच्या लोकांना आपल्या अधिरा स्वभाव आणि नकारात्मक विचारसरणी वर नियंत्रण ठेवावे लागेल.दाणगा उत्साह आणि चेहऱ्यावर हसू आपली एक ओळख आहे ते कायम तसेच ठेवा.