मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (16:25 IST)

वृश्चिक राशी भविष्य 2021

वृश्चिक राशीचे लोक गूढ गोष्टींमध्ये रुची घेणारे ओळखले जातात आणि वर्ष 2021 मध्ये आपली आवड खूप फायदेशीर ठरेल. एक उत्तम वर्ष आपली वाट बघत आहे. कौटुंबिक, रोमांस आणि व्यवसायाचा दृष्टीने हे वर्ष आपल्याला नवीन भेट देणारे ठरेल. थोडीअडचण आणि भटकंतीची स्थिती दिसून येईल पण नशिबाचे तारे प्रबळ असल्यामुळे आपण एखाद्या सेनापती प्रमाणे चमकाल. आपल्या राशीचा स्वामी मंगळ ग्रहांमध्ये एखाद्या सेनापतीची भूमिका बजावतो. या वर्षी  आपण आपल्या विरोधकांवर विजय मिळवाल. या वर्षी आपल्यामध्ये उत्साह आणि आशा भरपूर राहील. वर्षाच्या मध्यभागी आपल्या अडचणी वाढतील पण वर्षाच्या अखेरीस आपण एक यशस्वी व्यक्ती म्हणून समोर याल.हे वर्ष आपल्या सर्व स्वप्नांना पूर्ण करणारे असेल. परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी वर्षाचा शेवटचा महिना खूप चांगला राहील.
 
रोमांस साठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
रोमान्सच्या बाबतीत वर्ष २०२१ आपल्याला साठी जणू प्रेमाचा वर्षावच घेऊन आलेला असेल. हे वर्ष सुंदर आणि संस्मरणीय ठरेल. रोमान्सच्या बाबतीत ग्रहांची स्थिती बघून पुढे वाढा. या वर्षी आपल्या आयुष्यात ज्या व्यक्तीची आपण आतुरतेने वाट बघत होता ती येईल. रोमांस साठी ग्रहांची स्थिती आपल्या पक्षात राहील. आपले प्रेमाचे नाते वैवाहिक बंधनात अडकतील. जे जोडीदाराच्या शोधात आहे त्यांना एखाद्या प्रवासाच्या दरम्यान जोडीदार भेटेल. प्रेम हे खरे बंधन आहे या मध्ये प्रामाणिक असाल तर हे 2021 चे वर्ष आपल्यासाठी आश्चर्यकारक ठरेल. वर्ष 2021 मध्ये एप्रिल,मे,जुलै आणि ऑक्टोबर चे महिने प्रेमाच्या सुवासाने बहरतील. विवाहित असाल तर आपल्या जोडीदाराच्या भावनांचे आदर करा. आपल्या आयुष्यातून तणाव दूर करा. हे वर्ष एकमेकांना समजून घेण्याची  उत्तम संधी घेऊन येईल. 
 
आर्थिक व्यवहारासाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
वर्ष 2021 ची सुरुवात वृश्चिक राशींच्या लोकांसाठी दणक्याची असेल.पैसे येतील. त्या पैशाची आपण बचत कराल म्हणजे स्थिर लक्ष्मी मिळेल. या वर्षातील आर्थिक स्थिती मनाजोगती असेल.या वर्षात खर्च कमी होतील.त्यामुळे पैशांच्या व्यवस्थापनात काही अडचण येणार नाही. वर्षाच्या मध्यकाळात आपल्याला पैसे मिळविण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. वर्षाच्या अखेरीस समृद्धी मिळेल. देवाची उपासना करण्यात नियमितता ठेवावी लागेल. शुभ ऊर्जेसाठी देवाची भक्ती आणि उपासना करण्यात थोडा वेळ द्यावा. आई लक्ष्मीची कृपा या वर्षी मिळेल.आपले आचरण शुद्ध ठेवा आणि कपटापासून स्वतःला दूर ठेवा. 
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
वर्ष 2021 मध्ये नोकरीत आपल्याला आदर मिळेल आणि आपल्या कारकीर्दीचे  कौतुक केले जाईल.. एखाद्या नव्या आणि चांगल्या नोकरीच्या संधी येतील. मार्च ते एप्रिल च्या मध्यकाळात थोडी सावधगिरी बाळगावी लागेल कारण या काळात नोकरीत बदल होण्याचे योग जुळून येत आहे. जून ते जुलै च्या मध्यकाळात नोकरी गमावण्याच्या धोका असू शकतो, म्हणून संयम आणि सावधगिरी बाळगा. नोव्हेंबरच्या महिन्यात परदेशगमनाचे योग जुळून येतील. जे लोक व्यवसाय करतात त्यांची प्रगती होईल. वर्ष 2021 चा मध्यकाळ व्यवसायासाठी कमकुवत असेल पण अखेरचे महिने खूप आनंदी जाण्याचे योग बनत आहे.
 
आरोग्यासाठी कसे असणार वर्ष 2021 :
वर्षाच्या सुरुवातीस या राशीच्या लोकांना श्वासाचे त्रास उद्भवतील. त्वचेचे विकार देखील होऊ शकतात. वर्षाच्या मध्यकाळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरेल. आपण खूप परिश्रमी आहात पण या वर्षी आपल्याला शरीराला पुरेशी विश्रांती देण्याची गरज जाणवेल. साथीच्या रोगामुळे आपल्याला कोणत्याही प्रकाराच्या संसर्गाला टाळावे लागेल. आपली रोग प्रतिकारक शक्ती बळकट करावी. आवश्यकता असल्यास औषधोपचार करा.आरोग्य बळकट असेल तरच आपण सर्व सुखांचा आनंद घेऊ शकाल. वर्षाचा अखेर आरोग्याच्या बाबतीत चांगले राहील. तरी ही आपल्याला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. आपली इच्छा शक्ती जरी दाणगी असेल तर त्याच्या जोरावर आपण आपले आरोग्य सुधारा आणि स्वतःला सामर्थ्यवान करा. हाच सल्ला आपल्याला देण्यात येत आहे.