सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (11:02 IST)

सिंह राशी भविष्य 2021

वर्ष 2021 सिंह राशीच्या विध्यार्थ्यांसाठी चांगले राहणार आहे. शिक्षणामध्ये उत्कृष्ट निकाल मिळतील. या वर्षी आपण बरेच काही मिळवू शकता.सितारे सांगत आहे की या वर्षी पैशे जास्ती खर्च होतील,पण आर्थिक उत्पन्न देखील चांगले राहील. या वर्षी 2021 मध्ये मित्रांचे सहकार्य लाभतील. पण नोकरीत शॉर्टकट घेणे टाळावे आणि आपल्या परिश्रमावर विश्वास ठेवा. परदेशवारी करावयाची असल्यास या वर्षी संधी मिळू शकेल. या वर्षी 2021 मध्ये एक खबरदारी घ्या की कोणाच्या वादग्रस्त प्रकरणात आपले मत देऊ नका तसेच आपली गुपित कोणालाही सांगू नका. हे आपल्यासाठी त्रासदायक असू शकेल. चला तर मग जाणून घेऊ या की हे नवे वर्ष 2021 रोमांस,धन, करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत आपल्या साठी कसा जाणार आहे.
 
रोमांससाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
रोमांस साठी वर्ष 2021 साधारण असणार पण वेळ सरता-सरता आपले रोमांस चे तारे देखील चमकतील. वर्षाचा मध्यकाळ आपल्यासाठी खूपच चांगल्या संधी घेऊन येणार आहे. नात्यांत जवळीक येईल. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान आपल्या रोमान्सच्या जीवनात चांगले संकेत मिळत आहे. विवाहित असणाऱ्यांना हे वर्ष 2021 चढ-उताराचे असेल. आपल्या जोडीदाराचे आरोग्य आपल्या नात्यात काही समस्या उद्भवू शकतात. त्यांची काळजी घ्या आणि नात्यात सुधार आणण्याचा प्रयत्न करा.
 
आर्थिक व्यवहारासाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
वर्ष 2021 ची सुरुवात धनासाठी मध्यम फळ देणारे असणार, कारण वर्षाचे सुरुवातीचे महिने खर्चिक दिसत आहे. पण आनंदाची गोष्ट अशी की या मुळे आपले कोणतेही काम अडणार नाही किंवा आपले फारसे नुकसान होणार नाही. पैशाच्या बाबतीत वर्षाच्या मध्यकाळाचे काही महिने चांगले राहतील. जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिने आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतील आर्थिक स्थिती आपल्या मनाप्रमाणे बळकट होईल. फेब्रुवारी, मे आणि सप्टेंबर महिने थोडे कमकुवत राहतील. वर्ष 2021 मध्ये पैशाची गुंतवणूक विचारपूर्वक करा. किंवा या साठी आपण योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. कारण हे वर्ष पैश्याच्या गुंतवणुकीसाठी चांगले दिसत नाही.   
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
सिंह राशीच्या नोकरदार वर्गासाठी वर्ष 2021 अनुकूल आहे. त्यांना त्यांच्या उत्तम कारकीर्दीचे फळ मिळतील.कामाला पुढे ढकलण्याची सवय सोडा,हे आपल्यासाठी त्रासदायी होऊ शकते. वर्षाचे सुरुवातीचे काळ आपल्या नोकरीत खूप आश्चर्यकारक असू शकतील. वर्षाचा मध्यकाळ सामान्य असेल. वर्षाचा शेवटचा टप्पा आपल्यासाठी  त्रासदायी असू शकतो. आपण आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर आपली विशिष्ट ओळख निर्माण कराल. व्यवसायाच्या दृष्टीने वर्षाचा मध्यकाळ अधिक चांगला आहे. व्यापारी वर्गासाठी सुरुवातीचे काही महिने कमकुवत राहतील. कोरोनाच्या काळात आपल्या व्यवसायावर परिणाम झाला असेल तर त्यामधून निघायला काही काळ लागेल पण आपल्या राशीच्या प्रमाणे आपण वर्षाच्या अखेरीस अधिक मजबूत होऊन चमकाल.
 
आरोग्यासाठी कसे असणार वर्ष 2021 : 
वर्ष 2021 मध्ये आपले सर्व आजार आणि त्रास नाहीसे होतील. कारण आपले आरोग्याचे तारे 2021 मध्ये बळकट दिसत आहे. आपण मानसिक तणाव आणि काळजी पासून दूर राहाल. आपल्याला पोटाची आणि मूत्रपिंड किंवा किडनीच्या आजारांची काळजी घ्यावी लागेल. वेळीच वैद्यकीय परामर्श आवर्जून घ्या आणि त्यांनी सांगितल्यानुसारच आपल्या दिनचर्येला बनवावे लागेल. सिंह राशीच्या लोकांसाठी वर्ष 2021 चा अखेरचा महिना आनंदाची बातमी घेऊन येईल आणि आपल्याला आरोग्याच्या समस्यांपासून मोठ्या प्रमाणात मुक्ती देखील मिळू शकेल. या वर्षी वजन नियंत्रित करू शकाल.