सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (10:22 IST)

या रंगाचा आपल्या आहारात समावेश करावा

रंगाच्या शिवाय जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. रंग हे जीवनात आनंद, सौंदर्य, उत्साह आणि चांगले आरोग्य घेऊन येतात. जर आपण प्रत्येक रंगाची फळे आणि भाज्यांमध्ये असलेल्या पोषक घटक आणि त्यांच्या फायद्याच्या विषयी जाणून घेतल्यावर आपल्यासाठी निरोगी राहणे काहीच कठीण काम नाही. आम्ही आपल्याला निरोगी आणि सुंदर बनविण्यासाठी हा रंगीबिरंगी आहार चार्ट तयार केला आहे.  
 
1 हिरवा रंग -
वैदिक काळापासूनच हिरव्या झाडांचा वापर औषधीच्या रूपात केला जात आहे, जी आपल्याला निरोगी आणि बळकट बनवून राहण्यात मदत करतात. हिरव्या रंगाचे फळ आणि भाज्यात आढळणाऱ्या सल्फोरॅफेन, आयसोथियोसायनेट, इंडोल, ल्युटीन सारखे पोषक तत्त्व डोळ्यांची दृष्टी वाढवतात. दात आणि हाडे देखील बळकट करतात. हिरव्या भाज्यांच्या नियमित सेवनाने शरीरात झालेली व्हिटॅमिन ए, बी-कॉम्प्लेक्स, सी च्या सह कॅल्शियमची कमतरता देखील दूर होते.
काय खावं ? 
हिरव्या पालेभाज्या, कोबी, काकडी, बीन्स, ब्रोकोली, कांद्याची पात, हिरवे वाटाणे किंवा मटार, नाशपाती, हिरवे द्राक्ष, हिरवे सफरचंद इत्यादी.
 
2 लाल रंग -
या रंगाच्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये लायकोपिन आणि अँथोसायनिन आढळतात, जी स्मृती वाढविण्यात मदत करतात आणि  कर्करोग होण्याच्या शक्यतेला देखील कमी करतात. या सह शरीरातील ऊर्जाची पातळी देखील वाढवतात. ज्यामुळे आपण दिवसभर ताजेतवाने राहतो.
काय खावं - 
लाल रंगाचे फळ आणि भाज्या, जसे की टोमॅटो, बीट, लाल द्राक्षे, गाजर, स्ट्राबेरी, कलिंगड, लाल ढोबळी मिरची, चेरी, सफरचंद आणि डाळिंब इत्यादी आपल्या आहारात समाविष्ट करावे.
 
3 पिवळा आणि केशरी रंग - 
या रंगाचे फळ आणि भाज्यांमध्ये असलेले अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, बायोफ्लेवोनॉइड इत्यादी रोग प्रतिकारक शक्तीला वाढवतात. हे त्वचेला निरोगी आणि तरुण ठेवतो, फुफ्फुसांना बळकट करतात, हृदयरोग होण्याच्या शक्यतेला कमी करतात आणि रातांधळेपणाच्या रोगाला कमी करून फायदा देतात.
काय खावं - 
संत्री, लिंबू, आंबा, अननस, नाशपाती, पीच, जर्दाळू, नारंगी, गाजर, पिवळे टोमॅटो, पिवळी ढोबळी मिरची, मक्का, मोहरी, भोपळा, खरबूज इत्यादी.
 
4 पांढरा रंग -
या रंगाच्या फळामध्ये आणि भाज्यांमध्ये असलेले एलिसीन, फ्लेवोनॉइड इत्यादी पोषक घटक कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी करतात ,हृदयाला निरोगी ठेवतात. कर्करोग आणि ट्यूमर होण्याची शक्यता कमी करतात.
काय खावं -
केळी,मुळा, मशरूम,फुलकोबी, बटाटे,पांढरे कांदे, लसूण इत्यादी.
 
5 निळा आणि जांभळा रंग - 
या रंगाच्या फळ आणि भाज्यांमध्ये आढळणारे अँथोसायनिन त्वचेला निरोगी आणि तरुण ठेवतो. हृदयाला बळकट ठेवतो आणि कर्करोग होण्याची शक्यता कमी करतो. 
काय खावं - 
जांभूळ, करवंद, आलू बुखारा, जांभळे द्राक्ष, ब्लॅक बॅरी, ब्लू बॅरी, जांभळा पानकोबी, वांग, इत्यादी.