मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 15 एप्रिल 2020 (12:15 IST)

Life Style Tips : दिवसभरात हे 20 कार्य घडत असतील तर उत्तम परिणाम मिळतील

आपण आपल्या दैनंदिनी कार्यात काही बदल करून आपले आयुष्य दीर्घायु आणि निरोगी ठेऊ शकतो. यासाठी आपण या 20 गोष्टींना आत्मसात करा आणि आयुष्याचा आनंद घ्या.
 
1 दररोज सकाळी सूर्योदयाच्या आधी 2 ते 3 कीमी चालावे, तसेच संध्याकाळी पण चालावे. दिवसाची सुरुवात सूर्याच्या पूजनाने करावी. सूर्य आपणांस शक्ती देते. जे आपणांस अंत:करण आणि मनाला उत्स्फूर्तता देते.
 
2 शरीराला नेहमीच ताट उभे राहण्याची सवय लावावी आणि तसेच बसायला पण ताठ बसण्याची सवय लावावी. 
 
3 अन्नसेवन करून आपण आपले आरोग्य योग्य बनवतो ह्याचा उत्तम मार्ग म्हणजे नेहमी उत्तम खाणे आणि उत्तमरीत्या चर्वण करणे. ज्यामुळे आपले पचनतंत्र व्यवस्थित राहील. आणि कोणतीही समस्यां उद्भवणार नाही.
 
4 लट्टपणाची मुख्य कारणे तेलकट आणि गोड पदार्थ आहेत. जे चरबी वाढवते. शरीरात आळशीपणा वाढवते. हे मर्यादित वापरावे.
 
5 खराब गरिष्ठ पदार्थ खाणे टाळा. असल्यास एक दिवस जेवण्याचे लंघन करावे किंवा उपवास करावा. सकस आणि संतुलित आहार घ्यावा.
 
6 वाहनांची सवय टाळावी. कमी अंतरावर जाण्यासाठी वाहनाचा वापर न करता पायी जावे. ज्यामुळे आपल्या स्नायूंना व्यायाम करण्यास मदत होते. हे आपणास निरोगी आणि आकर्षक ठेवेल. आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करेल.
 
7 जास्तच जास्त फळे आणि भाज्यांचा सेवन करावा. त्यांचा कडून नैसर्गिक स्निग्धता घ्यावी. 
 
8 आळशीपणा येऊ देऊ नका. त्यामुळे त्वरित कार्य करावे.

9 आपले घराचे कार्य स्वतः करा जेणे करून आपले व्यायाम होईल
 
10 व्यस्त राहणे हे वरदान आहे आपल्याला दीर्घायुष्यासाठीचे औषध आहे. म्हणून स्वतःला व्यस्त ठेवावे.

11 आपल्या व्यक्तिमत्वानुसार कपडे घालावे. काही घट्ट कपडे घालावे ज्यामुळे आपण तजिले रहाल.
 
12 जीवन चलायमान आहे. हे नेहमी लक्षात ठेवावे. 
 
13 आपल्या जीवनाच्या लक्ष्य आणि उद्देशाना लक्षात ठेवून कार्य करावे.
 
14 शरीराचा प्रत्येक भाग छिद्रामधून श्वास घेतो. म्हणून झोपताना स्वच्छ कपडे घालावे, सूती कपड्यांचा वापर करावा.
 
15 केसांना नीट नेटके बांधून ठेवावे. नियमाने तेल लावावे. केसांना स्वच्छ ठेवावे. 
 
16 नियमाने आपल्या आराध्य देवाचे स्मरण करावे.
 
17 रागावर नियंत्रण ठेवावे. रागामुळे शरीर आणि मनातले सौंदर्य नष्ट होते. रागाच्या क्षणी स्वतःला संयमित ठेऊन आपली शारीरिक ऊर्जा कमी होण्यापासून टाळा.
 
18 मनाची आणि बोलण्याची अस्थिरता बऱ्याच वेळा कमी केली जाऊ शकते. म्हणून बोलण्यात संयम ठेवावे.
 
19 शरीराचे सौंदर्य स्वच्छतेत असते. त्यासाठी काळजी घ्यावी.
 
20 सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ कपडे घालावे.