शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (20:05 IST)

आठवड्यातून एकदा उपाशी राहण्याचे हे 5 आरोग्यदायी फायदे....

आजारी व्यक्तीशिवाय प्रत्येकाला खायला खूप आवडते. व्रत कैवल्याशिवाय कोणालाही उपाशी राहणाच्या विचार करणे अशक्य आहे. पण आपण जर एक दिवशी उपाशी राहिल्यास आपल्याला आरोग्याचे फायदे मिळतील. आपणास हे फायदे कळल्यावर आपण हे नक्कीच कराल...
 
1 आठवड्यातून एक दिवस उपाशी राहिल्याने शरीराची अंतर्गत शुद्धी होते. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये उत्सर्जित होऊन शरीर निरोगी राहते.
 
2 आठवड्यातून एकदा उपाशी राहून आपण अपचन, अतिसार, बद्धकोष्ठता, आंबटपणा, जळजळ होण्यासारख्या त्रासांपासून मुक्त होऊ शकता. अश्यावेळी फळांचे सेवन पण आपण करू शकता.
 
3 एकदिवस उपाशी राहण्यामुळे आपले उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रालचे स्तर नियंत्रित होते आणि या पासून उध्दभवणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते.
 
4 आठवड्यातून किमान एक दिवशी उपाशी राहण्याने कॉलेस्ट्राल कमी होते. जे हृदयाचे त्रासांपासून वाचवते.

5 आपले पचनतंत्र चांगले राहण्यासाठी आपणास एक दिवस जेवण्याचे लंघन करायलाच हवे. असे केल्यास पाचनतंत्राचा त्रास उध्दभवत नाही आणि आपले पचनतंत्र सुरळीत 
 
राहते आणि चांगले कार्य करते.