शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (15:48 IST)

साप्ताहिक राशीफल 12 ते 18 डिसेंबर 2021

मेष 
स्पष्ट बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे कोणचा गैरसमज झाला असेल तर तो निस्तरण्यात वेळ जाईल. व्यवसायात माणसांची परख मेलाची ठरेल. आर्थिक व्यवहारात गाफील राहू नका. सरकारी नियम आणि अनपेक्षित खर्चामुळे तात्पुरता त्रास सहन करावा लागले. 
भाग्यशाली अंक 1
भाग्यशाली रंग पिवळा 
 
वृषभ 
महत्तवाचे ग्रह अनुकूल आहेत. यश मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. हितचिंतकांकडून तुम्हाला जी मदत मिळेल तीच उपयोगी पडणार आहे. व्यवसायधंद्यात हाताबाहेर गेलेल्या समस्येला पूर्ववत करण्यात वेळ जाईल. घरात पूर्वी लांबलेले कार्यक्रम पार पडतील. 
भाग्यशाली अंक 5
भाग्यशाली रंग हिरवा 
 
मिथुन 
तुमच्या क्षेत्रात मानमरातब मिळवाल. कामाचा ताण कमी होईल. नित्यकामात सामधान मानणारी तुमची रास आहे. विनाकारण कोणत्याच गोष्टींचा तुम्ही विचार करीत नाह. मात्र एखादी बाब तुमच्या मनात शंकाकुशंका निर्माण करेल. घरात खर्चावर नियंत्रण ठेवा. 
भाग्यशाली अंक 5
भाग्यशाली रंग गहरा हिरवा 
 
कर्क 
चांगल्या-वाईट दोन्ही अनुभवांतून जावे लागेल. व्यवसायात कामाचा ताण वाढेल. व्यक्तिगत कारणाकरता कोणाशी उधार उसनावर केली असेल तर त्या बाबतीत काटेकोर राहा. व्यापारी वर्गाला धावपळ करावी लागेल. प्रकृतीच्या बाबतीत हेळसांड करून चालणार नाही. 
भाग्यशाली अंक 9
भाग्यशाली रंग मेहरून 
 
सिंह 
जुने कोर्टव्यवहार अथवा सरकारी कामे यात लक्ष घालावे लागेल. लवचिकता स्वीकारावी लागेल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीतजास्त फायदा करून घ्या. नोकरीत काफील राहून चालणार नाही. अतिविश्वास टाळा. नवीन जागेत राहावयास जाण्याचे योग येतील. 
भाग्यशाली अंक 11
भाग्यशाली रंग ऑरेंज 
 
कन्या 
अवतीभवतीच्या माणसांशी तुमहई कसे हितसंबंध ठेवता यावर बर्‍याच गो्टी अवलंबून असणार आहेत, म्हणून त्याल विशेष महत्व द्या. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. हितशत्रूंवर बारीक नजर ठेवणे गरजेचे होईल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. 
भाग्यशाली अंक 15
भाग्यशाली रंग चॉकलेटी 
 
तूळ 
ग्रहमान जरी तुम्हाला चांगले असेल तरी पूर्वीच्या चुकांचा परामर्श घेण्याची वेळ आली आहे. तुमच्या सभोवताली असणारी माणसे त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांची नाराजी व्यक्त करतील. नोकरीत कामानिमित्त प्रवास घडेल. परदेशगमनासाठीही योग्य कालवधी आहे. 
भाग्यशाली अंक 15
भाग्यशाली रंग ग्रे
 
‍वृश्‍चिक 
ज्या कामात तुम्ही इतरांवर अवलंबून आहात त्यात त्यांच्याच शब्द फिरवण्यामुळे तुमची गैरसोय आणि धावफल होईल. नोकरीत अर्धवट कामे मार्गी लागतील. घरातील वाद संपुष्टात येतील. 
भाग्यशाली अंक 4
भाग्यशाली रंग चमेली 
 
धनू 
आवकेपेक्षा जावक वाढेल. परंतु ती चांगल्या कारण्यासाठी असेल. व्यवसायात नवीन कामांना गती द्या. एखादी चांगली संधी तुमच्यापुढे असेल, ती हातातून निसटण्याची शक्यता आहे. व्यापारीवर्ग आणि कारखानदारांनी स्पर्धकांच्या हालचालींवर नजर ठेवावी. नोकरीत तुमचेच सहकारी प्रगतीच्या आड येण्याची शक्यता आहे. 
भाग्यशाली अंक 15
भाग्यशाली रंग हिरवा 
 
मकर 
ह्या आठवड्यात तुम्ही बर्‍याच मानसिक अवस्थेतून ‍जाणार आहात. मुलांच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या प्रश्नामुळे भावनावश व्हाल आणि काहीतरी मार्ग शोधून काढाल. व्यावसायात कामाचा व्याप वाढेल. आर्थिक स्थिती सामाधानकारक राहिल्याने आनंद वाटेल. महत्त्वाकांक्षा वाढेल. नोकरीत सहकारी तुमची खुशामत करतील. 
भाग्यशाली अंक 6
भाग्यशाली रंग क्रीम 
 
कुंभ 
घरातील एखाद्या सदस्याच्या प्रश्नामुळे तुम्ही विचलित व्हाल. त्याची तीव्रता सप्ताहाच्या मध्यानंतर कमी होईल. नवीन जागा किंवा वाहन खरेदीसारखे निर्णय शक्यतो घेऊन नका. व्यवसाय व घर दोन्ही सतर्क राहावे लागेल. व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने पावले उचलाल. मनातील सुप्त इच्छा साकार करण्यासाठी प्रयत्न कराल. 
भाग्यशाली अंक 8
भाग्यशाली रंग चमेली 
 
मीन 
वस्तुस्थिती जाणून त्याप्रमाणे कृती करा. व्यवसायात अडचणींवर मात कराल. प्रवास करताना अनोळखी व्यक्तींवर जास्त विसंबून राहू नका. तसेच स्वत:चे सामान संभाळा. व्यापारधंद्यातील लांबलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. नोकरीमध्ये तुमच्या अत्यावश्यक मागण्या आठवड्याच्या शेवटी वरिष्ठांसमोर ठेवा. 
भाग्यशाली अंक 3
भाग्यशाली रंग कॉफी