सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Updated : सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (11:56 IST)

Ank Jyotish 18 सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 18सेप्टेंबर

numerology
मूलांक 1 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असू शकतो. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कला आणि संगीतात रस असेल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटू शकाल. नोकरी आणि व्यवसायात संबंध फायदेशीर ठरतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. विरोधकांना जिंकता येईल.आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत असू शकतो.
 
मूलांक 2  नोकरी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. विरोधकांपासून सावध राहा. कोणत्याही कामात घाई करू नका. महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी कमी होतील. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 3 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल.नोकरी आणि व्यवसायातील  वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन योजनांवर काम सुरू कराल.व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात मधुरता राहील.. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा बेत आखता येईल आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 4 -कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात आजचा दिवस संमिश्र फळ देणारा आहे. महत्त्वाच्या बाबींचा विचार करूनच निर्णय घ्या. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा.नोकरी आणि व्यवसायात बदल संभवतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सध्याच्या कौटुंबिक समस्येचे निराकरण होईल. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस आनंददायी राहील. उत्साहाने भरलेले असाल. रचनात्मक कार्यात रस वाढेल.कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल असेल.कुटुंबाचे सहकार्य मिळेल. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात अतिथीचे आगमन होऊ शकते.आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 6 - आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आज कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. व्यवसायात लाभाच्या संधी कमी होतील. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. व्यवसायाच्या संदर्भात सहलीला जाण्याची योजना असू शकते. शारीरिक थकवा तुम्हाला व्यापून टाकू शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 7 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. अहंकाराच्या भावनेपासून दूर राहा. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.
 
मूलांक 8 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवहारात नम्र वागा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. . मानसिक तणावामुळे त्रास संभवतो. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते.
 
मूलांक 9 - आज नोकरी आणि व्यवसायात वातावरण सामान्य राहील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. भविष्याची चिंता मनावर वर्चस्व गाजवू शकते. कठोर परिश्रमात यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मानसिक  तणावामुळे त्रास संभवतो.