शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By

Ank Jyotish 27 नोव्हेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 27 नोव्हेंबर

numerology
मूलांक 1 -आजचा दिवस सामान्य असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग तयार करता येतील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी उपलब्ध होतील. जोखमीच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील.आरोग्य सामान्य राहील.  
 
मूलांक 2 -आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. कठीण कामेही सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात.नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्य सामान्य राहील.
 
मूलांक 3 -आजचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी क्वचितच समोर येतील. कुटुंबात आनंदाची बातमी येऊ शकते. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. संतती कडून चांगली बातमी मिळू शकते. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.
 
मूलांक 4 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. कोणतेही काम अपूर्ण ठेवू नका. नशिबाची साथ क्वचितच मिळेल. एखाद्या गोष्टीची चिंता मनात राहील. आर्थिक लाभाच्या संधी येतील. स्पर्धात्मक परिस्थितीपासून दूर राहा. वागण्यात सौम्यता ठेवा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
 
मूलांक 5 -आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरी आणि व्यवसायातील  वातावरण  अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांची संगत मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. अहंकाराच्या स्थितीपासून दूर राहा.  आरोग्य सामान्य राहील.
 
मूलांक 6 - आजचा दिवस व्यस्त असेल. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होऊ शकते. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांची साथ मिळेल. व्यवसायात लाभदायक संधी निर्माण होतील,  स्पर्धात्मक पदांपासून दूर राहा. व्यावसायिक सहलीचे नियोजन होऊ शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील.
 
मूलांक 7 -आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. चिंतेची भावना मनात राहील. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 8 - आज  उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या  सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.  वागण्यात सौम्यता ठेवा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील.  आरोग्य सामान्य राहील. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 9 -आजचा दिवस सामान्य असेल.नोकरी  आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. विरोधक सक्रिय होऊ शकतात. निरर्थक वादांपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात. संतती कडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे

Edited By - Priya Dixit