शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (22:28 IST)

दैनिक राशीफल 15.05.2022

daily rashi
मेष : तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल.
वृषभ : कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिस मध्ये लवकर सुट्टी होऊ शकते याचा तुम्ही फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकतात. तुमचे तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल, पण रात्री जेवताना मात्र हे वाद मिटून जातील.
मिथुन : तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. जे लोक विवाहित आहे त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. 
कर्क : तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा.
सिहं : महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे.
कन्या : आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. 'सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल.
तूळ : परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल
धनू : आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. 
मकर : कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होती परंतु त्याचा मन:शांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. जर तुम्ही आपल्या प्रेमी सोबत कुठे बाहेर फिरायला जात आहे तर कपडे विचार पूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर, तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. 
कुंभ : तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. तो/ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल.
मीन : तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे.