शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2023 (21:46 IST)

August Horoscope 2023 ऑगस्ट (2023) महिन्याचे भविष्यफल

monthly rashifal
मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)
या महिन्यात काहीतरी खास होणार आहे. राजकारणातली आवड उच्च स्थानावर पोहोचायला साहाय्यभूत ठरेल. स्पर्धेत यश मिळेल, साहित्य, संगीतातील आवडीचा फायदा होईल. तब्येतीची काळजी घ्या. महिन्याच्या पूर्वार्धात खर्च अधिक होईल, ज्यामुळे धन संचयात अडचण निर्माण होईल. चांदीच्या तांब्यात वाहत्या नदीचे पाणी भरून ठेवल्यास फायदा होईल. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नौकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. 
 
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) 
या महिन्यात कोणतेही काम करण्याआधी नीट विचार करा. तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीशिवाय यश मिळणे सोपे नाही, यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. देवाची आराधना करा, यामुळे आपले चित्त शांत राहील आणि येणारे दिवस त्रासदायक ठरणार नाहीत. एखादे महत्वाचे काम करायचे असल्यास त्याची जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्णत्वास नेण्‍याचा प्रयत्न करा.
 
मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)
थोडा कठिण काळ आहे. आपण कार्यक्रमांप्रती अरूची अनुभव कराल. मेहनत केली तरी फळ न मिळाल्यामुळे आलेल्या उदासीने तुमचे मन चिंतित राहू शकेल. अति विश्वासाच्या बदल्यात तुम्हाला धोका मिळू शकतो. रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या. एखाद्याचे मन दुखवेल असे वक्तव्य करणे महागात पडेल. खरेदी करताना निट काळजी घ्या. विक्री करताना समोरच्या व्यक्तीची चौकशी करुन निर्णय घ्यावा. कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्‍य विचार घर करतील.
 
कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)
अडलेली कामे मार्गी लागतील. समवयस्क लोकांसोबत प्रेमभाव वाढेल. नोकरीचे नवे योग जुळत आहेत. ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्याविरुद्ध कट रचत आहे, सावध राहा. मैत्री प्रेमात बदलण्याचे संकेत आहेत. विश्वास ठेवा, सर्व काही चांगले होईल. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्‍याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नौकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. मिळेल. व्यवसायात साहस दाखवण्याचा प्रयत्न कराल. 
 
सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे) 
महिन्याच्या पूर्वार्धात नवे काम सुरू करणे टाळा. व्यापारी वर्गाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागेल. दीर्घ प्रवास विशेष फायदेशीर ठरणार नाही. आरोग्यही ठीक राहणार नाही. नोकरदार लोकांना आपल्या सह-कर्मचारींच्या कट-कारस्थानांचा सामना करावा लागेल. अस्वस्थता वाढवणारा महिना आहे. नवीन रोग जडतील. व्यसनांपासून दूर रहा. मानसिक अस्वस्थता कायम राहिल. आपल्या निर्णयावर ठाम रहा. तुमच्यातील सहनशिलता या महिन्यात फायद्याची ठरेल. रखडलेले काम मार्गी लागेल. 
 
कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो) 
तुमच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. नशीबाची गाडी थांबून थांबून पुढे सरकत आहे. कुठेतरी काहीतरी अडथळा आहे जो तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतो आहे. मित्र तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तत्पर राहतील. जोडीदाराचे हेकेखोर वागणे मानसिक तणाव वाढवेल. नोकरदार लोकांचे बॉसशी पटणार नाही. आरोग्यही साथ देणार नाही. एकुणातच हा महिना आपल्याला शुभ फ़ळ देणार नाही. आर्थिक व्यवहार करताना त्यात पारदर्शकता ठेवा. व्यक्तीगत स्वार्थापासून दूर रहाण्‍याचा प्रयत्न करा. प्रवास योग संभावतो.
 
तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते) 
जीवनात प्रगती करण्यासाठी आपल्याला सहाय्याची गरज आहे. उच्च पदावर असलेल्या एखादा व्यक्क्तीसाबतच्या तुमच्या खाजगी ओळखीचा तुम्हाला लाभ होईल. धंदयात नवे दरवाजे तर उघडतील, पण या संधीसाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. वाहन वगैरे चालवताना जरा सावधानी बाळगा. या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात.
 
वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
महिन्याची सुरुवात झोकात होणार आहे. महिन्याचे उर्वरीत १५ दिवस फारच आनंददायक असतील. आपल्या मनाचा आवाज ऐका आणि जीव ओतून काम करा, यश नक्कीच मिळेल. जोडीदाराचे वागणे आपल्याला नवे काम करण्यासाठी प्रेरणा देईल. एखाद्या मंदिरात दान केल्याने लाभ होईल. स्वत:ला मनस्ताप करुन घेण्‍याची सवय असल्याने या राशीच्या व्यक्तींमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण अधिक दिसून येते. स्वातंत्र्य, न्याय, आणि स्वत:चाच निर्णय योग्य वाटत असल्याने इतर व्यक्तींशी जुळवून घेण्‍यात यांना अडचण येते.
 
धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)
हा महिना आनंद घेऊन येणार आहे, त्याचे स्वागत करा. नोकरदार लोकांना चांगली बातमी कळेल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. जीवनात नवा उत्साह संचारेल. शत्रूंवर विजय मिळवाल. वैवाहिक जीवन सुखद जाईल. जोडीदार तुमच्यासाठी ढालीसमान सिद्ध होईल. तुम्हाला तुमच्या चंचल मनावर नियंत्रण मिळवायला हवे, नाहीतर काही अडचणींचा सामना करावा लागेल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत.
 
मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)
या महिन्याची सुरुवात चांगली होणार आहे. जुन्या कर्जांपासून सुटका मिळेल. हो, जुने कोर्ट-खटले त्रासात टाकू शकतात. मन चंचल होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवा. अपत्याकडून चांगली बातमी समजेल. सासरकडून सुखद बातमी कळू शकते. नोकरी बदलण्याचे योग आहेत. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल. अनेक संकटं येतील, पण त्यातून आपोआपच सुटका होण्‍याची शक्यता आहे. आर्थिक योग चांगले आहेत.
 
कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)
महिन्याची सुरुवात थोडी निराशाजनक असेल. शत्रूंनी तुमच्याविरुद्ध कट रचले आहेत, सावधान राहा. बॉससोबत मतभेद होऊ शकतात. मुलांकडूनही त्रास मिळण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता सतावत राहील. आर्थिक फायदा मिळेल. करार किंवा कायदेविषयक बाबींमध्ये सतर्क रहा. राजकारणात प्रवेश करण्‍याचा विचार मनात घोळ घालेल, परंतु जरा विचार करुन निर्णय घ्या. साहित्यिकांसाठी हा महिना उत्तम आहे. साहस वाढेल. घाई-गडबडीने निर्णय घेऊ नका.
 
मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)
घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. गुंतवणुकीत आशानुरूप पैसे परत न मिळल्याने अशांती वाढेल. जोडीदाराचे वागणे खटकणारे असेल. तुमचा राग त्यात आणखी भर टाकू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. बाहेर खाणे टाळा. मेहनत करणार्‍यांना या महिन्यात योग्य तो मोबदला मिळेल. कोर्टाची पायरी चढण्‍याची पाळी आलीच तर काळजी करु नका. यातून कायमची सुटका होईल.