बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Updated : बुधवार, 7 डिसेंबर 2022 (11:41 IST)

तूळ राशिभविष्य 2023 Libra Bhavishyafal 2023

या राशीच्या लोकांसाठी वर्षाची दुसरी तिमाही खूप चांगली जाणार आहे. त्या काळात गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश करेल, तेव्हा तुमच्या कार्य जीवनात सकारात्मक बदल होण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमची पदोन्नती होऊ शकते आणि तुम्ही यशाच्या दिशेने पाऊल टाकाल. जरा थांबा, या बातम्या जाणून तुम्हाला आनंद वाटेल, पण या आनंदासोबत तुम्हाला काही समस्यांनाही सामोरे जावे लागेल. विशेषत: तुमचे कार्य जीवन आणि कौटुंबिक जीवन दोघात संतुलन करण्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पण जसे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे की 2023 हे वर्ष तुमच्यासाठी अनेक संधीं घेऊन आलेले आहे. 
 
वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत, मीन राशीतील राहूची चाल तुमच्या जीवनातील काही क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणेल, ज्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल. परंतु जेव्हा तुमचा सत्ताधारी ग्रह एका विशिष्ट कालावधीसाठी अस्त होईल, तेव्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील  गोष्टींना वेगळे वळण लागू शकते. त्या वेळी तुम्हाला काळजी वाटेल पण या गोष्टी क्षणिक आणि अप्रासंगिक असतील. 2023 मध्ये तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत. तर, तूळ राशीच्या जातकांसाठी, हे वर्ष जरी अडथळे आणणारे आहे तरी पण, वर्षाचा शेवट या राशींच्या जातकाचीअनेक नवीन संधी घेऊन येणार आहे. 
 
* तूळ प्रेम जीवन 2023 Libra Love Horoscope 2023 -
नवीन वर्ष 2023 तूळ राशीच्या स्त्री-पुरुषा जातकांसाठी  सकारात्मक आणि भाग्यवान असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. यासह, वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, ज्या जोडप्यांना किंवा प्रेमींना काहीतरी नवीन सुरू करायचे आहे, त्यांच्यासाठी हा काळ योग्य आहे. 2023 मध्ये या राशीचे लोक त्यांच्या जोडीदारासोबत चांगला आणि शांततेतवेळ घालवतील. ज्या जोडप्यांना किंवा प्रेमींच्या नात्यात काही समस्या असतील,तर  त्यांना नवीन वर्ष 2023 च्या पूर्वार्धापर्यंत त्यांच्या  सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.
 
2023 हे वर्ष अविवाहित लोकांसाठी खूप चांगले असणार आहे. तूळ राशीच्या अविवाहित लोकांचे भाग्य खुलणार आहे, कारण या राशीच्या जातकांच्या पत्रिकेत  राहू आणि शुक्र हे ग्रह 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत एकत्र असतील. परिणामी, या राशीच्या काही जातकांना योग्य जोडीदाराला भेटण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. पण असं  म्हणतात की जे सकारात्मक आणि चांगले विचार करतात त्यांच्या सोबत चांगलेच घडते.त्यामुळे नेहमी आशावादी आणि सकारात्मक राहा.
 
2023 मध्ये गुरु ग्रह पूर्णपणे  साथ देईल. तथापि, जेव्हा कुंडलीत शनि आणि गुरू ग्रह एकत्र असतात, तेव्हा जातकाला भावनिकदृष्ट्या काही चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. हे चढ-उतार तुमच्या नात्यावर दीर्घकाळ परिणाम करू शकतात.या राशीच्या जातकाचा आक्रमक स्वभाव त्यांच्या  नात्यासाठी योग्य नाही. विशेषतः रागावर नियंत्रण ठेवा. आपल्या संकल्पांवर ठाम राहण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्यांसाठी आपली वागणूक चांगली ठेवा.  
 
 जेव्हा तुम्ही तुमचा मुद्दा एखाद्या व्यक्ती समोर ठेवता तेव्हा गोष्टी विचार करूनच  बोला या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे  तुम्ही समोरच्या व्यक्तीशी चांगल्या हेतूने बोलत असता तरी काहीवेळा तुमच्या शब्दाचा अर्थ काही वेगळाच काढला जातो. परिणामी या मुळे नात्यावर त्याचा परिणाम होतो. 
 
* तूळ आर्थिक स्थिती 2023  Libra Finance Horoscope 2023 -
तूळ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक दृष्टिकोनातून खूप प्रगत असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून मंगळ प्रत्यक्ष असेल, तेव्हा जीवनात आर्थिक उन्नती आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल. या वर्षी तुम्ही कोणतीही काळजी न करता गुंतवणूक देखील करू शकता. तुम्ही सोने, दागिने इत्यादी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच ज्या जातकांवर कर्ज आहे त्यांच्यासाठी हे वर्ष खूप चांगले राहील.
 
  पैशाच्या बाबतीत, तिसरी तिमाही तुमच्यासाठी संघर्षाने भरलेली असू शकते. पण तुम्ही समजूतदार व्यक्ती आहात. तुम्ही घेतलेले योग्य निर्णय तुम्हाला सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी आणि गुंतागुंतीतून बाहेर पडण्यास मदत करतील. जर तुमच्याकडे एफडी आहे जी परिपक्व झाली आहे. तुम्ही ते वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापरू शकता. तूळ राशीच्या जातकांसाठी सांगण्यात येत आहे की, या वर्षी गुंतवणुकीच्या योजना अंमलात आणण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरी जावे लागू शकते.
 
गुंतवणुक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा आणि फायद्याची अधिक शक्यता असेल तिथेच गुंतवणूक करा. या साठी या क्षेत्रातील तज्ञांना भेटणे आणि याबद्दल संपूर्ण तपशीलवार चर्चा करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. तुला राशिभविष्य 2023  सल्ला देते की जर तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर तुम्ही जवळच्या मित्राचा किंवा अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा, कारण शुक्र ग्रह अस्त झाल्यामुळे काही काळ आर्थिक समस्या निर्माण होतील. हा काळ या राशीच्या जातकांसाठी कठीण असू शकतो.
 
या वर्षी तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या मोठ्या योजना आहेत. 2023 च्या शेवटच्या महिन्यात या राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कमाईच्या नवीन संधी मिळतील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. जर तुम्ही SIP घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते वर्षाच्या शेवटी करू शकता.
 
* तूळ करिअर 2023  Libra Career Horoscope 2023 -
संयम हीच यशाची गुरुकिल्ली आहे हे लक्षात ठेवा. तुला करिअर राशीभविष्य 2023 सांगते की वर्षाच्या सुरुवातीपासूनच शनि ग्रह या राशीच्या जातकांच्या जीवनात अनेक समस्या घेऊन येईल. परंतु व्यवसाय, शिक्षण आणि व्यवसायासाठी ते खूप अनुकूल असेल. व्यावसायिक क्षेत्रात, ज्यांना नोकरी किंवा काही काळ कामातून ब्रेक घ्यायचा आहे ते आत्मविश्वासाने करू शकतात. काही समस्या तुमच्या समोर येऊ शकतात, पण एकूणच हे वर्ष करिअरच्या दृष्टीने या राशीच्या जातकांसाठी चांगले राहील.
 
जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा नवीन करिअर सुरू करत आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी थोडा जोखमीचा असू शकतो. 2023 मध्ये तूळ राशीच्या विद्यार्थ्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हा काळ या राशीच्या जातकांसाठी  कठीण जाणार असल्याने आतून कमीपणा आणि उत्साहाची कमतरता जाणवेल. तसेच, जातक स्वतःला ध्येयापासून वंचित समजू शकतात. या राशीचे राशीचे जातक प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील आणि हळूहळू सर्व समस्यांवर मात करू शकतील.
 
व्यवसायाशी निगडित जातकांना नियोजन आणि पैशाची गुंतवणूक करण्याव्यतिरिक्त थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. जर कौटुंबिक व्यवसाय हाताळत असणारे तुम्ही स्वतः असाल, तर या राशीच्या जातकांसाठी सर्वोत्तम कौशल्ये दाखवण्याची वेळ आली आहे. वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत, तूळ राशीच्या जातकांनी व्यवसाय आणि उद्योगात सर्वोत्तम योजना आखाव्यात. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा कालावधी खूप फायदेशीर आहे.
 
 हे वर्ष तुमच्यासाठी कठीण जाईल. तुम्हाला वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतही असेच काहीसे जाणवू शकते. राहूचे भ्रमण आणि केतू सक्रिय असल्यामुळे तूळ राशीतील स्त्री-पुरुष जातकांसाठी हा काळ कठीण जाईल, विशेषत: तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता त्यांच्याबाबत सावधगिरी बाळगा. तुमची कुंडली दर्शवते की जे तुमच्यासोबत काम करतात, तेच लोक तुमच्यासाठी अडचणी निर्माण करतील. इतर तुमच्याबद्दल काय विचार करतात यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जातकांना स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक काळ निघून जातो, हा काळ देखील जाईल.
 
* तूळ कौटुंबिक स्थिती 2023  Libra Family Life Horoscope 2023 -
एकाच वेळी अनेक गोष्टी व्यवस्थापित करणे आव्हानात्मक असू शकते. असो, हे वर्ष या राशीच्या जातकांसाठी अडथळे आणणारे आहे. अशाच कौटुंबिक संबंध देखील यामुळे अस्पर्श राहणार नाहीत. 2023 मध्ये कौटुंबिक बाबी त्रास देऊ शकतात.  पालकांशी मतभेद झाल्यामुळे पालकांच्या बाबतीत घरगुती समस्या उद्भवू शकतात.. प्रभावित नातेसंबंध आणि जीवनातील उलथापालथींमुळे त्याचा परिणाम  आरोग्यावरही होऊ शकतो.
 
प्रत्येक वाईट काळ जसा सारतो, त्याचप्रमाणे या राशीच्या जातकांच्या समस्या संपतील आणि चांगल्या काळाची सुरुवात नक्कीच होईल. जर तुमचे एखाद्यासोबतचे संबंध बरेच दिवस चांगले जात नसतील तर त्यामुळे या राशीचे जातक तणावात येऊ शकतात. मात्र, वर्षाच्या शेवटच्या भागात या राशीच्या जातकांच्या अनेक समस्या संपतील. तरीही, जातकांना असे सुचवले जाते की त्रास आणि तणाव स्वतःपुरते मर्यादित ठेवणे नेहमीच योग्य नाही. असे केल्याने मनात ओझं राहते. 
 
2023 मध्ये तूळ राशीच्या काही राशीच्या जातकांना हा काळ चांगला जाईल. हा काळ जातकांसाठी चांगली बातमी घेऊन येणार असेल. पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसे तुमचे कौटुंबिक नातेही दोन्ही बाजू दाखवतील. तुमचे कुटुंबातील बहुतांश सदस्यांशी चांगले संबंध असतील, तुम्ही विवाहित असाल, तर तुमच्या घरगुती जीवनातही काही समस्या असू शकतात. पती-पत्नीमध्ये विनाकारण वाद होऊ शकतो. परस्पर मतभेदांमुळे कलह वाढू शकतो, त्यामुळे घरात आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
 
तुला कुटुंब कुंडली 2023 च्या भविष्यानुसार, पालकांना मुलांबद्दल चांगली बातमी मिळू शकते. हे वर्ष पालकांना आनंदाचे आणि आनंदाचे असेल. तथापि, वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामध्ये काही चढ-उतार होऊ शकतात. घराबाबत मुले किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना काळजी वाटू शकते. तसेच, भावंडांशी भांडण होऊ शकते, शनिमुळे तुमच्या घराशी संबंधित अनेक कामे दीर्घकाळ प्रलंबित राहू शकतात.
 
* तूळ आरोग्य 2023  Libra Health Horoscope 2023 -
राहू आणि केतू हे ग्रह या राशीच्या जातकांना या वर्षी सावध राहण्याचा सल्ला देतात. तुला आरोग्य कुंडली 2023 म्हणते की जे लोक आधीच आजारी आहेत त्यांनी स्वतःची अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे. तूळ राशीच्या काही जातकांचा वैद्यकीय पद्धतींवर विश्वास नसतो. या राशीच्या जातकाने  मानसिक अवरोध देखील काढून टाकावा, तूळ राशीच्या जातकांना अनेक रोगांपासून मुक्ती मिळेल, यामध्ये शरीर वेदना, मानसिक थकवा, चिंता यांचा समावेश आहे.
 
2023 च्या तूळ राशीच्या आरोग्य कुंडलीत शनि ग्रहाचा प्रभाव आहे, जो तुम्हाला संतुलित आणि निरोगी जीवन राखण्यास मदत करेल. तथापि, आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की आपल्या निरोगी दिनचर्या आणि सवयींमध्ये काहीही अडथळा येणार  नाही, कारण या वर्षी ग्रह आपल्यासाठी अनेक समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे तुमच्यासाठी चांगले नसलेले अन्न खाणे टाळा आणि नियमितपणे योगा किंवा ध्यान करा.स्वतःचे विचार सकारात्मक ठेवण्यासाठी स्वतःला काही चांगल्या कामात गुंतवून ठेवा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आजारावर कमी लक्ष केंद्रित करू शकाल, ज्यामुळे तुमची प्रकृती सुधारण्याची शक्यता अधिक होईल.
 
या राशीच्या जातकांच्या पत्रिकेत शनि आणि गुरु ग्रह असल्यामुळे तुमच्या विचार आणि कृती करण्याच्या क्षमतेत सकारात्मकता येईल. तूळ आरोग्य कुंडली 2023 असे भाकीत करते की या राशीचे जातक वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगली कामगिरी करतील. शुक्र ग्रहामुळे जातक ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतील.या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. पण याचा जातकांच्या आरोग्यावर फारसा परिणाम होणार नाही.
 
2023 च्या शेवटच्या महिन्यांत तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो. , जे लोक खूप ताणतणाव घेतात किंवा ज्यांचा आहार योग्य नसतो आणि त्यांच्या आरोग्याबाबत निष्काळजी असतात अशा जातकांमध्ये असे होण्याची शक्यता जास्त असते. तणावामुळे प्रतिकारशक्तीही खराब होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने या राशीच्या लोकांसाठी या वर्षातील अनेक महिने कठीण जाऊ शकतात.
 
* तूळ विवाह राशिभविष्य 2023  Libra Marriage Horoscope 2023 -
तूळ राशीतील स्त्री-पुरुषांसाठी 2023 हे वर्ष आरशासारखे असेल ज्यामध्ये ते स्वतःचे प्रतिबिंब पाहू शकतील. याचा अर्थ असा की या वर्षाचे स्वतःचे मूल्यांकन करून, स्वतःचे  वैवाहिक जीवन कसे आहे हे तुम्हाला कळू शकेल. तुमचे नाते टिकवण्यात कोणाचे योगदान जास्त आहे? भविष्याबद्दल बोलताना, वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तुमचा जीवनसाथी तुम्हाला पूर्णपणे  पाठिंबा देईल. तुमच्या दोघांच्या योजना यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्या जोडप्यांना एकत्र वेळ घालवणे थोडे कठीण जाईल. पण तुमच्या दोघांची सुसंगतता उत्कृष्ट असेल.
 
तूळ लग्न राशीभविष्य 2023 नुसार, विवाहित स्त्री जातक अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना या वर्षी अपत्य प्राप्ती होईल. तथापि, हे तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी होण्याची शक्यता जास्त आहे. जे लोक आपल्या कौटुंबिक कामात अडकले आहेत, त्यांची कामे पूर्ण होताना दिसत आहेत. यामुळे पती-पत्नीमधील संबंध सुधारतील, जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही गंभीर विषयावर चर्चा करायची असेल, परंतु तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत असाल तर 2023 हे वर्ष तुम्हाला तसे करण्याची संधी देईल.
 
लग्नाच्या प्रतीक्षेत असलेले अविवाहित जातक 2023 मध्ये लग्न करू शकतात. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी 2023 हे वर्ष चांगले राहील. जे पुरुष किंवा स्त्री जातक अजूनही अविवाहित आहेत ते या वर्षी स्वतःसाठी योग्य जोडीदार शोधू शकतात. ज्यांना अरेंज मॅरेज करायची आहे, ते 2023 च्या उत्तरार्धात लग्न करू शकतात.
 
लग्नाबाबत कायदेशीर बाबींमध्ये अडकलेले लोक लवकरच या संकटातून बाहेर येतील. तूळ लग्न कुंडली सांगते की लवकरच तुमची तुमच्या जीवनात सुरू असलेल्या सर्व संकटांपासून सुटका होईल. हे वर्ष या राशीच्या जातकांसाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही घटस्फोटासाठी अर्ज केला असेल, तर निकाल फलदायी आणि तुमच्या बाजूने असतील. वैवाहिक जीवनातील समस्यांवर तोडगा काढायचा असेल तर स्वतःला शांत ठेवा. जे काम कराल ते मनापासून करा.
 
* 2023 मध्ये तूळ राशीसाठी ज्योतिषीय उपाय  -Astrological remedies for  Libra in 2023 -
तूळ राशीसाठी ज्योतिषांनी दिलेल्या काही उपयुक्त आणि प्रभावी टिप्स खाली दिल्या आहेत, ज्यांचे पालन करून या राशीचे जातक वर्ष 2023 मध्ये यश मिळवू शकतात. यासह, आपण जीवनाच्या प्रवासातील अडथळे आणि कठीण परिस्थिती दूर करू शकता:
 
* सलग 21 शनिवार तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा.
* दररोज आई-वडील आणि सर्व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या.
* लाल रंगाचे कपडे आणि सामान टाळण्याचा प्रयत्न करा. तसेच, नवीन वर्ष 2023 ला पांढरे/हिरव्या रंगाचे कपडे घाला. ते तुमच्यासाठी चांगले राहील.
* कोणत्याही मंदिरात किंवा गरजूला बेसनाचे लाडू किंवा केळी दान करा.
* शनिवारी बालाजीला तुळशीची माळ अर्पण करा.
* दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे.
 
Edited By - Priya Dixit