शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (21:31 IST)

साप्ताहिक राशीफल 22 ते 28 जानेवारी 2023

weekly rashifal
मेष : प्रकृतीच्या तक्रारींकडेही लक्ष ठेवावे लागेल. नियोजनबद्धतेने प्रगती करता येईल. कोणत्याही कामाचा दबाव न घेता ते काम तुम्ही हसत खेळत पार पाडाल. सभोवतालची परिस्थिती खूप आशादायक वाटेल. पण प्रत्यक्षात मात्र तुमची दगदग, धावपळ कमी होणार नाही. तुम्हाला करीयर, नोकरी व्यवसाय अथवा व्यक्तिगत जीवनात बरेच वेगवेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे. कोणतीही महत्त्वाकांक्षा न बाळगता जर तुमचे काम मर्यादेत राहून केलेत तर त्याचा त्रास होणार नाही.
 
वृषभ : तुमच्या कौशल्याला बराच वाव मिळाल्याने तुमचा भाव वधारेल. कलाकार खेळाडू व्यक्तींचा उदोउदो होईल. नोकरीत इतरांना न मिळणारी एखादी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. कामानिमित्त परदेशात फेरफटका करण्याची संधी मिळेल. व्यापार धंद्यात अपेक्षित व्यक्तींकडून तुमच्या विचारांना आणि योजनांना साथ मिळाल्याने कामाचा वेग अपेक्षेपेक्षा वाढेल. पैशाची आवक सुधारल्याने बाजारातील प्रतिष्ठा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.
 
मिथुन : नोकरीमध्ये आवडत्या कामात सहभागी करून घेतले जाईल. विवाहाच्या प्रश्नात संदिग्धता असेल तर ती दूर होईल. चालत्या गाडीला खीळ बसल्यासारखी झाली असेल तर पुन्हा एकदा त्यात वेग येईल. आपले ग्रहमान सुधारले की सभोवतालच्या व्यक्तींचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सुधारतो याचा अनुभव येईल. व्यवसायधंद्यातील नवे बेत आकार घेतील. जनसंपर्क आणि प्रसिद्धिमाध्यमांचा मुबलक वापर करून उलाढाल वाढवू शकाल.
 
कर्क : मोठय़ा व्यक्तींच्या ओळखींचाही उपयोग होईल. नोकरीमध्ये बेचव वाटणारे काम संपुष्टात आल्याने हायसे वाटेल. नवीन कामाची सुरुवात होईल. तुमच्या आनंदी आणि उत्साही स्वभावावर ज्या मर्यादा आल्या होत्या त्या संपल्याने तुमच्यात नवी उर्मी निर्माण होईल. प्रचंड वेगाने काम करण्याची इच्छा असेल. व्यवसाय धंद्यात तुमच्या मालाची किंवा सेवेची जाहिरात जर व्यवस्थितपणे केलीत तर फायदा वाढवता येईल. विवाहोत्सुक तरुणांना मनपसंत व्यक्तींची जीवनसाथी म्हणून निवड करता येईल.
 
सिंह : प्रकृतीच्या जुन्या तक्रारींवर उपाय मिळू शकेल. घरामधे पूर्वी लांबलेल्या शुभकार्याची नांदी होईल. ज्यांनी तुम्हाला सहकार्याचे आश्वासन देऊन निराशा केली होती त्यांच्याकडून आता थोडीशी का होईना मदत मिळेल. बुडत्याला काडीचा आधार असे समजून त्याचा फायदा घ्या. व्यापार उद्योगात उत्पन्नाचे नवीन साधन शोधण्याचा विचार कराल. नोकरीमध्ये बराच तणाव देणारे काम आटोक्यात येईल.
 
कन्या : या आठवडय़ात नोकरीव्यवसायापेक्षा घरगुती जबाबदारीवर तुमचे लक्ष केंद्रीत होईल. जीवनाचा आनंद घ्याल. जीवन गतिमान बनेल. गुरू राशीच्या षष्ठस्थानात प्रवेश करेल. या स्थानातील गुरू प्रकृती आणि स्पर्धा या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यायला भाग पाडतो. जर त्यासंबंधी काळजी घ्या. पुढील वर्षभर व्यापारीवर्गाने स्वत:ची मर्यादा सोडू नये. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेत राहणे चांगले. घरातील नैतिक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील.
 
तूळ: तुम्ही नेहमीच्या कामाबरोबर कर्तव्यपूर्तीचा आणि जीवनाचा आस्वाद घेण्याचा आनंद अनुभवू शकाल. नोकरीमधे पगारवाढ आणि बढती मिळेल. त्याबरोबर कामाचा व्यापही वाढेल. व्यवसाय धंद्यचा विस्तार होईल. सांसारिक जीवनातील सुखद प्रसंगाची नांदी होईल. तरुणांचे विवाह जमून पार पडतील. नवविवाहितांच्या घरात पाळणा हलेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल.
 
वृश्चिक : या आठवडय़ात मनाप्रमाणे वागण्याचे समाधान लाभेल. घरामध्ये शुभकार्याच्या निमित्ताने पाहुण्यांची ये-जा राहील. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार न करता येणाऱ्या क्षणाचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल याचा विचार कराल. तरुणांना स्थिरता लाभून सांसारिक जीवनात पदार्पण होईल. नोकरी व्यवसायातील कामकाज सुरळीत चालल्याने शांतचित्ताने काम करू शकाल. स्वत:च्या वास्तूत राहावयास जाण्याचा योग येईल. विद्यार्थ्यांनी मात्र आळस करून चालणार नाही.
 
धनू : नोकरीमध्ये नवीन जबाबदारीकरता निवड होईल. त्याचे चांगले फायदेही मिळतील. परदेशात जाण्याचा योगही येईल. जबाबदारी आणि कामाचा तणाव इतका प्रचंड असेल की कधीकधी नको त्या सवलती असे वाटेल. घरामधे एखादी मोठी नैतिक जबाबदारी पार पाडावी लागेल. या आठवडय़ात अनेक लांबलेली कामे तुम्ही संपवाल.
 
मकर : वास्तविक सहसा कोणतेही नवीन प्रयोग करून पहाणे तुमच्या तत्त्वात बसत नाही. पण या आठवडय़ात अधिक यश अधिक पैसा मिळविण्याच्या इच्छेने काही नवे प्रयोग करून पहावेसे वाटतील. पूर्वीही तुमच्या आर्थिक आणि इतर स्वास्थ्यात त्याने चांगली भर टाकली होती. या आठवडय़ात व्यापार उद्येगात खर्च वाढले तरी नवीन मोठे काम मिळण्याची आशा निर्माण होईल. घरामधे शुभकार्य ठरेल/पार पडेल.
 
कुंभ : तुमच्यामध्ये एक रसिक व्यक्ती किंवा कलाकार दडलेला असतो. एखाद्या निमित्ताने ते तुम्ही प्रदर्शित करता तेव्हाच इतरांना त्याची जाणीव होते. या आठवडय़ात अशी संधी मिळेल. व्यवसाय धंद्यात आर्थिक किंवा इतर चिंता निर्माण झाली असेल तर हितचिंतकांच्या मदतीमुळे ती कमी होईल. गरजा भागवण्याइतके पैसे हातात पडतील. पण फार मोठी मनोरथे रचू नका. गृहसौख्यात भर पडेल.
 
मीन : प्रत्येक बाबतीत स्वत:वर र्निबध ठेवणे आवश्यक आहे. त्यात चूक झाल्यास त्याचा आर्थिक आणि इतर स्वरूपात भरुदड सहन करावा लागेल. व्यक्तीगत जीवनातही सर्व काही चांगले दिसत असून एकप्रकारचे मानसिक असमाधान राहील. आपल्या मर्यादेत राहून काम करा. नोकरीमध्ये कामाचा वेग या आठवडय़ात उत्तम राहील. अवघड उद्दीष्ट पार कराल. व्यापारातील कामाचा व्याप वाढेल. घरगुती जीवनात सर्वाना खूश ठेवण्याची मनीषा पूर्ण होईल. आवडत्या छंदामुळे मौजमजा येईल.