राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला जाता आले असते तर आनंद झाला असता : फडणवीस
येत्या 5 ऑगस्टला अयोध्येमध्ये राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी मला जाता आलं असतं तर आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्ये दिली आहे.
शिरपूर वरून मुंबईला जाताना ते काही वेळ नाशिकमध्ये थांबले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण आहे की नाही याची आपल्याला माहिती नसल्याचही फडणवीस यांनी सांगितले. आम्हाला बोलवले नसलं तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वांचे प्रतिनिधी म्हणून भूमिपूजन करणार आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी नाशिकच्या आमादार सीमा हिरे यांनी फडणवीस यांना राखी बांधली.