1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (08:52 IST)

खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातही कोरोनाचा शिरकाव

mp navneet ranas
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राणा यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राणा यांच्या कुटुंबातील जवळपास १० जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. 
 
नवनीत राणा यांच्या कुटुंबीयांपैकी कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये त्यांचा ४ वर्षांचा मुलगा रणवीर आणि ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. शिवाय त्यांच्या सासू- सासऱ्यांनाही या विषाणूचा संसर्ग झाला आहे.  
 
नवनीत राणा यांच्या सासऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळताच जवळपास ५० ते ६० जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय राणा यांच्या निवासस्थानासह आजूबाजूच्या परिसराचं निर्जंतुकीकरणही करण्यात येत  आहे.