बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राम मंदिर अयोध्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 जानेवारी 2024 (15:16 IST)

Ram Mandir Darshan Timing राम मंदिरात दर्शनाची वेळ वाढवली, आता भाविकांना रात्री उशिरापर्यंत दर्शन घेता येणार

Ram Mandir Darshan Timing: अयोध्येतील राम मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या पाहता मंदिर प्रशासनाने दर्शनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता भाविकांना रात्री 10 वाजेपर्यंत रामललाचे दर्शन घेता येणार आहे. पूर्वी ही वेळ फक्त संध्याकाळी 7 पर्यंत होती.
 
सकाळी 7 ते 10 या वेळेत सकाळच्या शिफ्टमध्ये दर्शन घेतले जाईल. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या दर्शनासाठी सुमारे पाच लाख भाविक अयोध्येत तळ ठोकून असून, भाविकांची आवक सुरूच आहे. मात्र राम लल्लाच्या भोग प्रसाद आणि आरतीसाठी काही काळ दरवाजे बंद राहतील. राम मंदिराबाहेर भाविकांची गर्दी पाहता ही व्यवस्था करण्यात आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ही प्रणाली तातडीने लागू केली आहे.
 
यापूर्वी राम मंदिरात रामललाच्या दर्शन आणि पूजेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. रामलला पहाटे चार वाजता उठतील अशी व्यवस्था होती. त्यानंतर त्यांचे स्नान, तप व शृंगार व आरती होईल. यानंतर सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत रामलला भाविकांना दर्शन देतील. त्यातही दुपारच्या वेळी भोगप्रसादासाठी दरवाजे बंद करण्याची तरतूद करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी मंदिराचे दरवाजे उघडताच भाविकांची एवढी गर्दी झाली की व्यवस्था करणे कठीण झाले.
 
रात्री दहा वाजेपर्यंत रामलला दर्शन देतील
अशात श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने नवी व्यवस्था केली आहे. यामध्ये रामललाची जागरणाची वेळ सारखीच राहणार असली तरी आठ वाजल्याऐवजी सात वाजल्यापासूनच ते भाविकांना दर्शन देण्यास सुरुवात करतील, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दुपारच्या भोग आरतीची वेळही कमी करण्यात आली आहे. रात्री दहा वाजेपर्यंत दर्शन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापनानुसार राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रांग कमी होत नाहीये.
 
वृद्धांना दोन आठवड्यांनी येण्याचे आवाहन
अशात वृद्ध आणि दिव्यांग लोकांना आधीच थांबविण्यात आले आहे. त्यांना दोन आठवड्यांनी येण्यास सांगण्यात आले आहे. तसेच इतर भाविकांनाही परिस्थिती लक्षात घेऊन थोड्या प्रतीक्षेनंतर येण्यास सांगण्यात आले आहे. यासह मंदिर प्रशासनाने प्रभूच्या दर्शन आणि पूजेचा कालावधी वाढवला आहे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, रामललाचे दर्शन सकाळी 7 ते 11.30 या वेळेत करता येईल. यानंतर भोग प्रसादाची वेळ असेल.