बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राम मंदिर अयोध्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2024 (11:50 IST)

राम मंदिरामध्ये चार दिवस vip दर्शन बंद

ram ji ayodhya
अयोध्यामध्ये राममंदिरात 15 ते 18 एप्रिल पर्यंत vip दर्शन बंद राहील. ट्रस्ट ने सांगितले की,15 पासून चार दिवस vip दर्शनाची कोणत्याच प्रकारची व्यवस्था राहणार नाही. तसेच ज्या लोकांनी vip पास काढले आहेत त्यांचे पास रद्द करण्यात येणार आहे. 
 
अयोध्या मध्ये राममंदिरात पहिल्यांदा भव्य दिव्य रामनवमी साजरी केली जाणार आहे. तसेच रामनवमी या पर्वावर मोठ्या संख्येने भक्तगण अयोध्यामध्ये दाखल होत आहे. गर्दीला पाहता सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रामनवमीच्या या पवित्र पर्वावर लाखो भक्तगण राममंदिरात येत आहेत. गर्दी बघता ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे की, सोमवार पासून vip दर्शन बंद राहील. तसेच ऑनलाईन बनवलेले पास देखील रद्द होतील. 
 
तसेच रामनवमीच्या या पर्वावर अयोध्या मध्ये vip दर्शन बंद तर राहील तसेच, मोबाईल नेण्यास देखील बंदी असणार आहे. रामनवमीच्या या पर्वावर अयोध्यामध्ये भव्य रामजन्म राममंदिरात साजरा केला जाणार आहे, व गर्दी पाहता सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. तसेच राममंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले की, ऑनलाईन बुकिंगला रद्द करण्यात आले आहे. अयोध्येमध्ये राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठे नंतर   राममंदिर परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजवला जात आहे. तसेच रामनवमीच्या दिवशी भव्य दिव्य उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे असून यादिवशी भक्तगणांना रामलल्लाचे दर्शन होईल.