मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. अयोध्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 30 सप्टेंबर 2010 (12:00 IST)

निकालानंतर शांतता पाळा- चिदंबरम

निकालानंतर शांतता पाळा चिदंबरम
अयोध्येचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. अलाहाबाद न्यायालय हा निकाल जाहीर करणार असून, निकालानंतर देशवासीयांनी शांतता पाळावी असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केले आहे.

चिदंबरम निकालानंतर पुन्हा एकदा पत्रकारपरिषद घेण्‍याची शक्यता असून, यात ते शांततेचे आवाहन करण्‍याची शक्यता आहे.

निकालानंतर सर्वोच्च न्यायालयात जाता येणार असल्याने कोणत्याही पक्षाने हा निकाल अंतिम आहे असे मानू नये असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.