1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified शनिवार, 19 ऑक्टोबर 2019 (11:25 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुरुंगात असलेल्या आमदाराकडून 53 लाख हस्तगत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अण्णा भाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या रमेश कदम यांच्याकडून पोलिसांनी 53 लाख 46 हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे. तब्येत बरी नाही असे सांगून तसेच ठाण्यामध्ये एक महत्त्वाचे पार्सल घ्यायचे आहे असे सांगत कदम यांनी पोलिसांना घोडबंदर रोडवरील एका फ्लॅटमध्ये नेले. तेथे पोलिसांनी छापा टाकला असता कदम यांच्याकडून ही रक्कम हस्तगत केली.
 
वैद्यकीय तपासणीसाठी कदम यांना रुग्णालयात नेले त्यानंतर मित्राकड़ून महत्त्वाचे पार्सल घ्यायचे आहे असे सांगत त्यांनी पोलिसांना घोडबंदरला नेण्याची विनंती केली. तेथिल फ्लॅटमधून पार्सल घेण्याच्या तयारीत असतानाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि कासारवडवली पोलिसांनी त्यांना पकडले. पार्सलची तपासणी केली असता त्यामध्ये 53 लाख 46 हजार रोकड आढळून आली.