1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 14 ऑक्टोबर 2019 (12:07 IST)

अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा टेंपो खाली आणला - भुजबळ

Ajit Pawar's resignation brought down Sharad Pawar's tempo - Bhujbal
ईडीच्या संदर्भात शरद पवार यांनी पुकारलेल्या आंदोलनाने उच्च टेंपो गाठला होता. अजित पवारांच्या राजीनाम्याने सगळा फोकस दुसरीकडे वळला आणि शरद पवारांनी आंदोलनाने उभा केलेला जनमानसाचा टेंपो खाली आला. 
 
अजित पवार यांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नव्हती, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
 
ते पुढे म्हणाले, अजित पवारांचा राजीनामा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा विषय यांच्याद्वारे विरोधी पक्षाचा फोकस बदलण्याचा प्रयत्न सतत काही मंडळी करत आहेत.