बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (10:16 IST)

अण्णांचे आजपासून मौनव्रत

महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयीन सुनावणी, आरोपींना शिक्षा करण्याची प्रक्रिया जलद व्हावी या मागणीसाठी अण्णा हजारे आजपासून (शुक्रवार) राळेगणसिद्दीत मौनव्रत करणार आहेत.
 
पोलिसांचा तपास, तपासानंतर न्यायालयात होणारी सुनावणीची प्रक्रिया जलद असली पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर हेल्पलाइनचे काम योग्य असले पाहिजे.
 
सर्वोच्च न्यायालयाने पोलीस दलात सुधारणा करण्यासंदर्भात केलेल्या सूचनांवर तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकारने न्यायाधीशांची पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. अशा अनेक मागण्यांसाठी आपण मौनव्रत धारण करणार आहोत पत्रक अण्णा हजारे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.