बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (10:14 IST)

फक्त मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी 10 रुपयांत जेवण

विधानसभा निवडणुकीत 10 रुपयांमध्ये जेवण देण्याचे आश्वासन शिवसेनेने सध्यातरी फक्त मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुरते पाळले आहे.
 
मुंबई महापालिकेच्या उपाहारगृहात 10 रुपयांमध्ये जेवणाची थाळी देण्याचा उपक्रम महापौर किशोर पेडणेकर यांच्याहस्ते सुरू करण्यात आला. मात्र ही 10 रुपयांची थाळी केवळ पालिकेच्या कर्मचाऱ्यासंसाठीच आहे. बाहेरच्या व्यक्तींना पालिकेच्या कॅन्टीनमध्ये 10 रुपयांमध्ये थाळी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.