'मंत्री आहोत याचे भान ठेवा, उगाच पाण्याच्या टाकीवर चढू नका'
"आपण आता मंत्री आहात याचे भान ठेवून वागा. उगाच कोणत्याही विषयावरून पाण्याच्या टाकीवर चढण्याचं आंदोलन करू नका," असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर झालेल्या बैठकीत दिला आहे.
"आपण वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आलो असलो, तरी आपल्याला जनतेनं निवडून दिलं आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत आपण सगळे एक आहोत. एक कुटुंब म्हणून आपल्याला काम करायचं आहे. एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली, तरी राज्यासाठी हिताचे काय याचाच विचार आपल्याला करायचा आहे याचं भान सर्वांनीच ठेवू या," असं उद्धव यांनी म्हटलं.
2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणू, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
याविषयी ते म्हणाले, "आपण आता मंत्री आहात याचे भान ठेवून वागा. उगाच कोणत्याही विषयावरून पाण्याच्या टाकीवर चढण्याचं आंदोलन करू नका. आता तुम्हाला कोणी खाली उतरवणार नाही. त्यामुळे कर्जमाफी तसंच सरकारचे अन्य निर्णय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम करा."