गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019 (07:51 IST)

इगतपुरीमध्ये कॉंग्रेसची हॅटट्रीक

Congress hat-trick in Igatpuri
घोटी – इगतपुरी त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीने विजयाची हॅटट्रीक साधली आहे. कॉंग्रेस महाआघाडीच्या हिरामण खोसकर यांनी महायुतीच्या निर्मला गावित यांचा 31 हजार मतांनी पराभव केला आहे.
 
निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान काही काळ निर्मला गावित यांनी आघाडी घेतली होती. मात्र नंतर ही निवडणूक अटितटीची होणार असा अंदाज चुकीचा ठरला. गावित पिछाडीवर पडल्या आणि त्यांना शेवटपर्यंत ही पिछाडी भरून काढता आली नाही. खोसकर यांनी अगदी एकतर्फीपणे या निवडणूकीमध्ये विजय संपादन केला.
 
सलग दोन वेळा निर्मला गावित यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना गावित यांनी कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर खोसकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. खोसकर यांना 86,561 मते मिळली, तर गवित्‌ यांना 55 हजार मते मिळाली. त्यामुळे खोसकर यांचा 31 हजार मतांनी विजय झाला.