मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (16:02 IST)

एकनाथ खडसेंचा कार्यकर्त्यांशी संवाद: भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नाही

पक्षाकडून आपल्याला तिकीट न मिळण्याची शक्यता नसल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे. मुक्ताईनगरमध्ये खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
 
या पार्श्वभूमीवर खडसे यांनी गुरूवारी (3 ऑक्टोबर) आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना आपल्याला तिकीट मिळणार नसल्याचं सांगितलं. खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अपक्ष लढण्याचा सल्ला त्यांना दिला.
 
खडसेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरात घोषणाबाजीही केली.
 
कार्यकर्त्यांची समजूत घालताना खडसेंनी म्हटलं, की आजपर्यंत मी पक्षाच्या आदेशाचं पालन केलं आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आदेश आला, मी एका मिनिटांत राजीनामा दिला. पक्ष माझ्यासोबत अन्याय करणार नाही.