शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (18:45 IST)

IPL Auction 2021: ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने मोजले 16.25 कोटी रुपये

आयपीएल टी-20 स्पर्धेसाठी लिलाव सुरू झाले आहेत. या लिलावात एकूण 61 खेळाडू आहेत. आतापर्यंत सर्वाधिक बोली क्रिस मॉरिसवर लावण्यात आली आहे. क्रिस मॉरिससाठी तब्बल 16.25 कोटी रुपयांची बोली राजस्थान रॉयल्सने लावली आहे.
त्यानंतर ग्लॅन मॅक्सवेलसाठी 14.25 कोटी रुपयांची बोली लावली आहे.
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलच्या लिलावात खेळाडूंसाठी कोटीच्या कोटी रक्कम मोजणं सुरू आहे. यंदा आतापर्यंतच्या लिलावात ख्रिस मॉरीस, ग्लेन मॅक्सवेल आणि जाय रिचर्डसन सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.
 
ख्रिस मॉरीसला राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतलं. त्यानंतर नंबर आहे ग्लेन मॅक्सवेलचा. ग्लेननला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 कोटी 25 लाख रुपयांना घेतलं. तर जाय रिचर्डसनसाठी किंग्ज XI पंजाबने 14 कोटी रुपये मोजले आहेत.
 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परदेशी खेळाडू त्यातही फलंदाजांकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
 
16 कोटी 25 लाख रुपयांसह ख्रिस मॉरीस आयपीएल इतिहासातला सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2015 साली युवराज सिंहसाठी 16 कोटी रुपयांची बोली लागली होती.
 
गेल्यावर्षी ख्रिस मॉरिस आरसीबीने 10 कोटी रुपये मोजले होते. यंदा मॉरीससाठी त्यांनी 8 कोटी रुपयांची बोली लावली. मात्र मुंबई, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज XI पंजाबने बोली वाढवत नेली. शेवटी राजस्थान रॉयल्सने 16 कोटी 25 लाख रुपये म्हणत मॉरीसला खेचून आणलं.
असाच आणखी एक महागडा खेळाडू ठरला ग्लेन मॅक्सवेल. ग्लेनची बेस प्राईस होती 2 कोटी रुपये. ग्लेनसाठी आरसीबी आणि सीएसकेमध्ये चांगलीच जुंपली. कोलकाता नाईट रायडर्सने 2 कोटी रुपयांपासून बोली सुरू केली. त्यानंतर आरसीबीने थेट 4 कोटी रुपयांची बोली लावली.
 
त्यानंतर बोली वाढत गेली. सीएसकेने 6 कोटी म्हटले.पुढे आरसीबी आणि सीएसके बोली वाढवत गेले. तब्बल 14 मिनिटं मॅक्सवेलसाठी बोली चालली. पण अखेर 14 कोटी 25 लाख रुपये मोजत विराट कोहलीच्या आरसीबीने ग्लेनला आपल्या संघात ओढलं.
जाय रिचर्डसनसाठी आरसीबीने बोलीला सुरुवात केली. त्यानंतर दिल्ली आणि पंजाबनेही एकावर एक बोली लावली. दिल्लीने 3 कोटी म्हटल्यावर बंगळुरूने 4 कोटी म्हटले. पुन्हा दिल्लीने 5 म्हटले. त्यानंतर बंगळुरूने साडे सात कोटी म्हटले. त्यानंतर पंजाबने 9 कोटी म्हटल्यावर बंगळुरूने थेट 10 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावली.त्यानंतर पंजाबने थेट 12 कोटी म्हटले. अखेर पंजाबने जाय रिचर्डसनला 14 कोटी रुपयांना खरेदी केले.
 
मोईन अलीसाठी CSK आणि किंग्ज इलेवनमध्ये स्पर्धा झाली.
 
2 कोटी बेस प्राइस, पण चेन्नईने मोईनला 7 कोटींना घेतले. पंजाबने 5.25 कोटींना जवळपास घेतलेच होते. पण अचानक चेन्नईने शेवटच्या क्षणी 7 कोटी बोलून आघाडी घेतली. 7 कोटीला पंजाबने माघार घेतली आणि मोईन चेन्नईचा झाला.
 
मुंबईचा ऑलराऊंडर शिवम दुबेला राजस्थान रॉयल्सने 4.4 कोटींना घेतले. त्याची बेस प्राइस होती 50 लाख रुपये. शिवम दुबेसाठी दिल्ली 3.8 कोटी तर हैदराबाद 3.4 कोटी मोजायला तयार होती. पण RR ने बाजी मारली.
 
उमेश यादवला किंग्ज XI पंजाबने 1 कोटी रुपयांना विकत घेतले.
 
तर पियुष चावलाला मुंबईने 2 कोटी 40 लाख रुपयांना घेतले.
 
मुंबईने ऑस्ट्रेलियाच्या नेथन कोल्टर नाईलला 5 कोटी रुपयांना घेतले. त्याची बेस प्राईस होती 1.50 कोटी रुपये.
 
बांग्लादेशचा ऑलराऊंडर शकीब अल हसन KKR ने 3 कोटी 25 लाख रुपयांना घेतले.
 
अनसोल्ड
हरभजन सिंह - बेस प्राईस 2 कोटी
 
करुण नायर - बेस प्राइस 50 लाख
 
हनुमा विहारी - बेस प्राइस 1 कोटी
 
केदार जाधव - बेस प्राइस 2 कोटी