1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (14:29 IST)

बाबरीपासून ते मराठी अस्मितेसाठी अनेक खटल्यांना तोंड दिलंय - संजय राऊत

Kangana Ranaut
अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईच्या पाली हिलमधील बंगल्याचं पाडकाम मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी केलं होतं. याप्रकरणी आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही प्रतिवादी बनवण्याची मागणी अभिनेत्री कंगना राणावतने केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
 
"बाबरी खटल्यापासून ते मराठी अस्मितेसाठी लढण्यापर्यंत अनेक खटले आपण अंगावर घेतले आहेत. आपलं शहर आणि राज्याच्या अभिमानासाठी लढा देण्यापासून ही गोष्ट रोखणार नाही," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध मुंबई महापालिका प्रकरणावर उच्च न्यायालयात बुधवारी (23 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिलमधील बंगल्याचं पाडकाम केलं होतं. या कारवाईविरोधात कंगनाने कोर्टात धाव घेतली.
 
कारवाईचे आदेश देणारे अधिकारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची मागणी कंगनाकडून करण्यात आली. न्यायालयाने संजय राऊत आणि अधिकाऱ्यांना बुधवारपर्यंत बाजू मांडण्यास सांगितलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटरवर याबाबत प्रतिक्रिया दिली.