शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (21:01 IST)

कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, पुणे, महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण?

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 23 लाख 29 हजार 464 एवढी झाली आहे.
 
राज्यात बुधवारी (17 मार्च) कोरोनाची लागण झालेले 23,179 नवीन रुग्ण आढळले, तर 9,138 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात सोमवारी 48 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
 
मुंबईमध्ये बुधवारी तब्बल 2,377 नवीन रुग्णांची नोंद झाली.
 
नागपूर महापालिका क्षेत्रात एका दिवसात तब्बल 2,698 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
 
राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 91.26 % आहे.
 
सध्या महाराष्ट्रात 1 लाख 52 हजार 760 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूंचा आकडा 53 हजार 080 वर पोहोचला आहे