पुणे शहरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
पुणे शहरातील मोठ्या सोसायट्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून शहरात अवघ्या दोन आठवड्यात तब्बल 121 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आले असून यामध्ये जवळपास 95 टक्के मोठ्या सोसायट्या तसेच इमारती आहेत.
सर्वाधिक 19 प्रतिबंधित क्षेत्र औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोना रुग्णवाढ झोपडपट्ट्यांच्या तुलनेत सोसायट्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले असून त्यातही प्रामुख्याने औंध-बाणेर, हडपसर, कोथरूड तसेच सिंहगड रस्ता परिसरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ झाले आहेत.