शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 9 जानेवारी 2020 (10:15 IST)

शांततेत आंदोलने कशी करायची ते तरुणांकडून शिका - मुंबई उच्च न्यायालय

शांततेत आंदोलन करून आपल्या आवाजाची ताकद अधिकाधिक कशी वाढवायची याचे धडे आताची तरुणाई देत आहे. इतर लोकांनी त्यांच्याकडून ते शिकायला हवं, अशा शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या आंदोलनाची दखल घेतली आणि त्याचं कौतुक केले.
 
शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे की मनोरंजनाचे मैदान आहे याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच्या सुनावणीच्या दरम्यान न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाने या आंदोलनाचे कौतुक केलं.
 
राज्य सरकार शिवाजी पार्कचे विश्वस्त आहे. त्यामुळे ते मैदान खेळाव्यतिरिक्त इतर कामांसाठी उपलब्ध करायचे असेल तर त्यात न्यायालयाने हस्तक्षेप का करावा, असं न्यायालयानं यावेळेस विचारले.