शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 13 जानेवारी 2020 (10:09 IST)

'कमिशन मिळत नाही म्हणून ममतांचा केंद्रीय योजनांना विरोध'

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा देशभरातील आठ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला, मात्र पश्चिम बंगाल सरकारने ही योजना राज्यात लागू केली नाही.
 
कारण या योजनेत पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे यात कोणाला कमिशन मिळत नाही म्हणूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा केंद्रीय योजनांना विरोध आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
 
कोलकाता पोर्ट ट्रस्टला 150 वर्षं पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिल. कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नाव बदलून श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट करण्याची घोषणा त्यांनी यावेळेस केली.