1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 3 डिसेंबर 2019 (13:45 IST)

मोदींनी सोबत येण्याची ऑफर दिली होती - शरद पवार

Modi had offered to accompany him - Sharad Pawar
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर तयार झालेल्या सत्तापेचादरम्यानच शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. या भेटीत सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्याची मोदींनी ऑफर दिली होती. मात्र, मोदींची ही ऑफर आपण नाकारली, असं पवारांनी सांगितलं.  
 
राष्ट्रपतीपदाची भाजपकडून ऑफर होती का, असा प्रश्न पवारांना विचारलं असता, त्यांनी वृत्त फेटाळलं. ते म्हणाले, "मला राष्ट्रपतीपदाची ऑफर नव्हती, मात्र सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्याची ऑफर नक्कीच होती."
 
नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सोबत येण्याचीही ऑफर दिली होती, अशी माहिती शरद पवार यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत दिली. मात्र, ती ऑफर आपण नाकारल्याचंही पवारांनी नमूद केलं.
 
मोदींच्या ऑफरबद्दल पवार यांनी सांगितलं, "अतिवृष्टीसंदर्भात बोलणं झाल्यानंतर पंतप्रधानांनी थांबण्यास सांगितलं आणि म्हटलं, की आपण एकत्रित काम केल्यास आनंद होईल. परंतु मी ती ऑफर नाकारली. मी त्यांना सांगितलं, की आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत, ते राहतीलही. पण आपण एकत्र काम करणं मला राजकीयदृष्ट्या शक्य नाही."
 
दरम्यान, एबीपी न्यूज हिंदीच्या मुलाखतीत शरद पवार यांना जस्टिस लोया प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला गेला. न्या. लोया प्रकरणाची पुन्हा चौकशी झाली पाहिजे का, या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी म्हटलं, "मला हे प्रकरण माहित नाहीये, मी वृत्तपत्रांमधून वाचलंय. यावर काही लेखही वाचले. या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या लोकांमधील हा चर्चेचा विषय आहे. माझ्याजवळ याबाबत पूर्ण माहिती नाही."
 
त्यामुळं न्या. लोया प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाईल का, हा प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.