1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (11:10 IST)

नेहरूंचा संयुक्त राष्ट्राकडे जाण्याचा निर्णय हिमालयाएवढी मोठी चूक

Amit shah
"काश्मीरचा इतिहास मोडून-तोडून देशासमोर ठेवला गेला, कारण ज्यांची चूक होती त्यांनी हा इतिहास लिहिला. स्वत:ची चूक झाकण्यासाठी चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला. मात्र आता खरी वेळ आली आहे की, जनतेसमोर काश्मीरचा खरा इतिहास मांडला जाईल," असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. माजी सरकारी अधिकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
"काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. हे कलम हटवण्यासाठी आम्ही अनेक वर्षं संघर्ष करत होतो. ज्यावेळी आपलं सैन्य जिंकत होतं त्यावेळी युद्धविराम का दिला गेला? त्यावेळी युद्ध थांबवण्याची काय गरज होती? संयुक्त राष्ट्राकडे जाण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घेतला. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. नेहरूंची ही चूक हिमालयाहून मोठी होती. हा दोन्ही देशामधला वाद होता," असं शहा म्हणाले.