शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानं युवकाचं मुंडन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी मुंबईतील एका व्यक्तीला चोप देऊन त्याचं मुंडन केलं. रविवारी (22 डिसेंबर) हा प्रकार घडला. या व्यक्तीचं नाव राहुल तिवारी असं आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीस्थित जामिया मिलिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईची तुलना जालियनवाला बाग प्रकरणाशी केली होती. त्यानंतर या व्यक्तीने ही पोस्ट लिहिली होती.
 
सदरहू व्यक्तीने आपण विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाशी संलग्न असल्याचं सांगितलं होतं. "मला मारहाण करण्याऐवजी पोस्टवर कायदेशीर कारवाई करता आली असती," असं या व्यक्तीने म्हटलं.