EPF मधील पैसे काढण्यासाठी काही अटींसह परवानगी

Last Modified सोमवार, 30 मार्च 2020 (16:03 IST)
कोरोना व्हायरसमुळं आरोग्यासह आर्थिक संकटही गडदत होताना दिसतंय. देशव्यापी लॉकडाऊनमुळं नोकरदार वर्ग तर अधिक अडचणीत सापडल्याचं दिसून आल्यानं केंद्रीय कामगार मंत्रालयानं संदर्भात मोठं पाऊल उचललंय.
सुमारे सहा कोटी EPF खातेदार आपापल्या खात्यातून पैसे काढू शकतात. मात्र, त्यासाठी सरकारनं काही अटीही ठेवल्या आहेत. एबीपी न्यूजनं ही बातमी केलीय.

तीन महिन्याची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता किंवा खात्यातील एकूण रकमेपैकी 75 टक्के रक्कम, यातील जी रक्कम छोटी असेल, ती काढता येईल. ही रक्कम परत करण्याची आवश्यकता नाहीय म्हणजेच नॉन-रिफंडेबल आहे.

28 मार्च 2020 पासून ही योजना लागू असेल, असं केंद्रीय कामगार मंत्रालयानं पत्रकात म्हटलंय. तसंच, ज्या कर्मचाऱ्यांनी रक्कम काढण्यासाठी अर्ज केला असेल, त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आलेत.

यावर अधिक वाचा :

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार
येत्या ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच ...

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार
राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार ...

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द ...

आयएमएकडून आज राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय ...

आयएमएकडून आज  राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता
केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची ...

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द
जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १०जुलै २०२०ची अधिसूचना रद्द करण्याच्या ...