मनसेच्या बाईक रॅलीला पुणे पोलिसांची परवानगी नाही
पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज अर्थात शनिवारी काढण्यात येणाऱ्या राजगर्जना बाईक रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे . मात्र मनसेचे पदाधिकारी बाईक रॅली काढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे मनसे आणि पुणे पोलीस यांच्यात संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली रॅली मुस्लिमबहुल भागातून जात असल्यामुळे परवानगी नाकारल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. या बाईक रॅलीत मनसेचे 5 हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी वेळेवर परवानगी नाकारल्याचाही आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे बाईक रॅलीआधी मनसे कार्यकर्ते आणि पुणे पोलिसांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.