पुन्हा एकदा गॅस गिझरचा बळी, वायूमुळे तरुणाचा गुदमरुन मृत्यू
पुण्यातल्या कोथरुड परिसरात रामराजे किशोर संकपाळ (३०) या तरुणाचा गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे गुदमरुन मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने घराचा आणि बाथरुमचा दरवाजा तोडून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत कोथरुड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
याआधी सुद्धा आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी सर्रास गॅस गिझर वापरले जातात मात्र, त्याच्या सुरक्षाविषयक नियमांकडे बहुधा दुर्लक्ष केलं जातं. याच नियमांकडे दुर्लक्ष केल्यानं अनेकांचे जीव गेले आहेत.
आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी सर्रास गॅस गिझर वापरले जातात मात्र, त्याच्या सुरक्षाविषयक नियमांकडे बहुधा दुर्लक्ष केलं जातं. याच नियमांकडे दुर्लक्ष केल्यानं अनेकांचे जीव गेले आहेत.
बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी असावी. बहुतेक ठिकाणी असते, मात्र, अनेकवेळा ती बंद केली जाते. त्यामुळे आतील वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. यावर उपाय म्हणून बाहेरील हवा आत घेणारा आणि आतील हवा बाहेर सोडणारा एक्झॉस्ट फॅन बाथरूममध्ये बसवावा. जेणेकरुन हवा खेळती राहून, गॅसमुळे कोंडी होणार नाही.