शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (13:20 IST)

पुण्यातून ५०० हून अधिक चाईल्ड पॉर्न क्लिप अपलोड

पुण्यातून चाईल्ड पॉर्नच्या तब्बल 500 हून अधिक क्लिप इंटरनेटवर अपलोड झाल्या आहेत. खडक पोलीस ठाण्यात याबाबत तिसरा गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी एकाला अटक केली आहे.  राज पुट्टीलाल असं या बहाद्दराचं नाव आहे.
 
पुट्टीलालच्या मोबाईलवरुन 28 एप्रिल 2019 रोजी लहान मुलांचा अश्लील व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. पुट्टिलालचे  सिमकार्ड काकाचा मुलगा वापरत असून तो अल्पवयीन आहे. पुणे आणि पिंपरीतील 14 प्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी अजूनही गुन्हे दाखल होऊन अटकेची शक्यता आहे.