शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By

अभिनेत्री मानसी नाईक सोबत छेडछाड

पुण्यात युवासेनेच्या एका कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना अभिनेत्री मानसी नाईक सोबत छेडछाड करण्यात आली आहे. याप्रकरणी आता साकीनाका पोलीस ठाण्यात तीघांविरोधात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ फेब्रुवारीला पुण्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव सदर गुन्हा घडला. युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने आपल्याशी गैरकृत्य केल्याचे मानसीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
 
मानसी नाईक यांनी याविषयी एका वृत्तवाहिनीला सविस्तर प्रतिक्रिया देताना सांगितले की, रांजणगाव येथे आपण कार्यक्रमात असताना एका अज्ञात व्यक्तीने मंचाजवळ येऊन गैरकृत्य केले. तसेच धमकवण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण आता रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केले आहे.