शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (12:00 IST)

पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रं, मग शिवरायांचं कर्तृत्व का दिसत नाही? - अमोल कोल्हे

पुण्यातील विमानतळावर लावण्यात आलेल्या पेशवेकालीन पेंटिंगबद्दल खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून सध्या या पोस्टची प्रचंड चर्चा सुरू आहे.
 
पुण्याच्या विमानतळावर पेशवाईची चित्रं दिसतात, मग शिवरायांचं कर्तृत्व का दिसत नाही?, असा प्रश्न उपस्थित करणारी पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे. सकाळनं याबाबत बातमी दिली आहे.
 
पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लाल महालसुद्धा आहे, सिंहगडही आहे. याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी हेही आहे, असं अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
त्याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूरही पुण्यात आहे, याचा पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय? असा सवालही कोल्हे यांनी केला आहे. पेंटिंगसोबतचा एक सेल्फीदेखील त्यांनी पोस्ट केला आहे.