डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेवरून विरोधी पक्ष टीकेची झोड उठवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पाच लाख कोटी अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षात देश मजबूत झाला असून हे लक्ष्य साध्य करता येईल असं ते म्हणाले.
असोसिएशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या शताब्दी पूर्ततेनिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.Together, we will realise the dream of a $5 Trillion economy. pic.twitter.com/4Vvo934ICk
— Narendra Modi (@narendramodi) December 20, 2019
देशासाठी काम करताना बराच रोष पत्करावा लागतो. अनेकांची नाराजी सहन करावी लागते. अनेक आरोपांना सामोरं जावं लागतं. असे अर्थव्यवस्था, जीएसटी आणि उद्योगस्नेही वातावरणनिर्मितीच्या बाबतीत बोलताना पंतप्रधान म्हणाले.