गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (14:50 IST)

BSNLमध्ये कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव

"BSNLच्या 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, तरी कंपनीत 1 लाख कर्मचारी असतील," असं मत BSNLचे अध्यक्ष प्रवीण कुमार पुरवर यांनी व्यक्त केलं आहे.  
 
"आमच्या स्पर्धकांपेक्षा BSNLमधील कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आम्ही स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावावर चर्चा करत आहोत. जवळपास 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव विचाराधीन आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.
 
BSNLमधील कर्मचाऱ्यांवर एकूण महसुलापैकी 70 टक्के रक्कम खर्च होते, असंही त्यांनी पुढे म्हटलंय. कर्मचाऱ्यांना आकर्षक पॅकेज देऊन त्यांच्यासमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव ठेवू असं प्रवीण कुमार म्हणाले.