शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (08:45 IST)

हिंदू असल्यानं पाकिस्तानकडून कनेरियावर अन्याय- शोएब अख्तर

''दानिश कनेरिया हिंदू होता म्हणून त्याच्यावर अन्याय झाला. काही खेळाडूंना तर तो आमच्यासोबत का जेवतो? असाही आक्षेप होता,'' असं वक्तव्य पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं केलं आहे.  
 
''या गोष्टीवरून माझं दोन-तीन खेळाडूंशी भांडण झालं. जर कोणी हिंदू असेल तर तो पण खेळेल. त्याच हिंदू असलेल्यानं आम्हाला टेस्ट सीरिज जिंकून दिली. तो इथं जेवण का घेतोय? असा प्रश्न एका खेळाडूने विचारला. तेव्हा तुला इकडून बाहेर फेकून देईन, असं मी त्याला ऐकवलं. तो तुम्हाला 6-6 विकेट घेऊन देतोय. इंग्लंडमध्ये दानिश आणि शमीने आम्हाला सीरिज जिंकवून दिली होती,'' असंही शोएब अख्तर यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, आखाती देशांतील हिंदूना धमकावणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवायला हवं, असं वक्तव्य केरळच्या भाजपच्या नेत्यानं केलं आहे.
 
केरळचे भाजप प्रवक्ते बी. गोपाळकृष्णन यांनी म्हटलंय, ''इंडियन युनियन मुस्लीम लीगनं जातीयवादी तत्वं पसरवली आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत भूमिका मांडल्यामुळे काही जण आखाती देशांतल्या हिंदूंना धमकावत आहेत. त्यांना पाकिस्तानात पाठवायला हवं.''