बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (08:42 IST)

NPR: अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

NPR: A complaint filed against Arundhati Roy
लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीबाबत (NPR) केलेल्या विधानाप्रकरणी सुप्रीम कोर्टातील वकील राजीवकुमार रंजन यांनी तक्रार दाखल केली आहे.  
 
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध दिल्ली विद्यापीठात एकवटलेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी (25 डिसेंबर) अरुंधती रॉय यांनी मार्गदर्शन केलं.
 
यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, ''राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि डिटेन्शन कॅम्पविषयी सरकार खोटं बोलत आहे. NPR साठी सरकारी अधिकारी-कर्मचारी तुमच्या घरी आल्यास त्यांना तुमचं नाव 'रंगा बिल्ला' सांगा.''
 
"सरकारला चुकीची माहिती देण्याचा सल्ला देऊन अरुंधती रॉय यांनी एकप्रकारचा गुन्हा केला आहे. त्यामुळेच मी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे," असं राजीवकुमार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.