मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

नेहरू कप: हॉकीच्या मैदानात तुंबळ हाणामारी

नॅशनल स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नेहरू कप हॉकी स्पर्धेत पंजाब पोलीस आणि पंजाब नॅशनल बँक सामनादरम्यान दोन्ही संघात तुंबळ हाणामारी झाली.
 
दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांवर हॉकीने हल्ला केला. मैदानात अचानक सुरू झालेल्या या हाणामारीमुळे काहीवेळ प्रेक्षकही गोंधळून गेले. मात्र मैदानात हाणामारी सुरू झाल्याचं कळताच प्रेक्षकांचीही गडबड उडाली.
 
हाणामारीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. आयोजकांनी मैदानात धाव घेऊन दोन्ही संघातील खेळाडूंना शांत केलं. दोन्ही संघांच्या 8-8 खेळाडूंनिशी सामना सुरू झाला. यावेळी पीएनबीने 6-3च्या फरकाने जिंकला.
 
भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी याप्रकारची गंभीर दखल घेतली असून, दोन्ही संघ आणि त्यांच्या व्यवस्थापकांविरोधात करण्याची मागणी केली आहे. घडलेल्या प्रकाराचा अहवाल मागवण्यात आला असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं हॉकी इंडियाच्या सीईओ अलिना नॉर्मन यांनी स्पष्ट केलं.