1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (10:38 IST)

काँग्रेस नेते अहमद पटेलांच्या मुलाविरोधातही ईडीची नोटीस

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा मुलगा फैसल याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं नोटीस बजावली आहे. फैसल यांना स्टर्लिंग बायोटेक प्रकरणात ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे.
  
ईडीनं फैसल यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावलं आहे. स्टर्लिंग बायोटेक प्रकरणात ईडीनं आतापर्यंत केलेल्या कारवाईत हजारो कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीये.
 
स्टर्लिंग बायोटेक ही गुजरातमधील एक फार्मा कंपनी आहे. या कंपनीवर आंध्रा बँकेमधील घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय.
 
ईडीनं याप्रकरणी गेल्या महिन्यात अहमद पटेलांचे जावई इरफान सिद्दीकी यांचीही चौकशी केली होती. अहमद पटेल हे काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधीचे अत्यंत विश्वासू मानले जातात.