बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (12:34 IST)

तीस वर्षं जुना स्वेटर विकला गेला 2 कोटींपेक्षा जास्त रुपयांना

रॉक संगीतकार कर्ट कोबेन यांच्या डाग पडलेल्या, सिगारेटमुळे जळलेल्या आणि गेले तीस वर्षं न धुतलेल्या स्वेटरची लिलावात 3,34,000 डॉलर म्हणजेच 2,36,60,560 रुपये एवढ्या प्रचंड रकमेला विक्री झाली आहे.
 
1993 मध्ये कर्ट कोबेन यांनी एमटीव्हीच्या अनप्लग्ड परफॉर्मन्सदरम्यान हा स्वेटर परिधान केला होता.
 
त्यांनी हा स्वेटर परिधान केल्यानंतर पुन्हा धुतलेला नाही.
 
एखाद्या लिलावात सर्वाधिक रक्कम मिळालेला स्वेटर असं या पोशाखाचं वर्णन होतं आहे.
 
"लोभसवाणा असं हे वस्त्र आहे," असं ज्युलियन ऑक्शनचे अध्यक्ष डॅरेन ज्युलियन यांनी म्हटलं आहे.
 
कोबन यांनी वापरलेली गिटारही लिलावात मांडण्यात आली आहे. 3,40,000 डॉलर एवढी तिची किंमत निश्चित करण्यात आली आहे. गेल्या 7 वर्षांपासून ती इथं लिलावासाठी ठेवण्यात आली आहे.
 
कोबन यांनी निर्वाणाची स्थापना 1987मध्ये केली. मात्र प्रसिद्धीचा झोत त्यांना सोसला नाही. नैराश्य आणि ड्रग अॅडिक्शन यांच्या ते आहारी गेले.
 
त्यांनी एप्रिल 1994 मध्ये 27व्या वर्षी आत्महत्या केली.