रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (10:19 IST)

सोनं विकलं नाही - आरबीआयचं स्पष्टीकरण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) आपल्याकडील सुवर्णसाठा विक्रीस काढल्याचे वृत्त माध्यमांमधून पसरलं होतं. हे वृत्त आरबीआयनं फेटाळलं असून, सोन्याची विक्री किंवा कोणताही व्यापार केलेला नाही, असं स्पष्टीकरण आरबीआयनं दिलंय. 

तीन दशकांनंतर पहिल्यांदाच आरबीआयनं सोन्याची विक्री केली असून, जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यंदा ऑगस्टपासून सोन्याच्या व्यापारात सक्रिय झाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये पसरलं होतं.

Image copyrightTWITTER

त्यानंतर आरबीआयनं ट्वीट करून सांगितलं की, "आरबीआय सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केलंय. पण आरबीआयकडून सोन्याची विक्री किंवा व्यापार केला जात नाही."