ganesh chaturthi
✕

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, पुन्हा लॉकडाऊन नाही

Updated: शुक्रवार, 12 जून 2020 (17:05 IST)
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत वादळाचा फटका बसलेल्या कोकणाला दिलेल्या मदतीची माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेदेखील यावेळी उपस्थित होते.
 
पत्रकारांनी यावेळी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात दिलेल्या सवलतींबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना उद्धव यांनी म्हटलं, की आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. त्यामुळे सरकार जपून पावलं टाकत आहे.
 
कुठेही घाईगडबड न करता लॉकडाऊमध्ये शिथीलता टप्प्याटप्प्यानं आणली जाईल. अजूनही संकट टळलेलं नाही. पण कोरोनासोबत लढत असताना आपल्याला अर्थचक्रही बंद करून चालणार नाही, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.
 
अनलॉकच्या पहिल्याच दिवशी मैदानावर व्यायाम करायला जी झुंबड उडालेली पाहिली, ते पाहून भीती वाटली. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे, उघडीप ही जीवघेणी ठरत आहे, असं वाटलं तर नाईलाजानं पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागेल, असं ठाकरेंनी म्हटलं. .
 
उद्धव यांनी म्हटलं, की अत्यावश्यक सेवेसाठी लोकलची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. पण ही मागणी जीवनावश्यक वस्तू पुरवणारे जे कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी करत आहोत.
 
कोकणातील वादळग्रस्तांना किती आणि कोणती मदत?
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. नुकसान भरपाई, पंचनामे सुरु आहेत. रायगडला तात्काळ मदत केलीआहे.
कोकणात वादळामुळे वीजेचे खांब उखडले गेले आहेत. त्यांच्या दुरूस्तीसाठी एक पथक पाठवण्यात येणार आहे.
गरीबांना प्रति झोपडी 15 हजार, काजू, द्राक्ष, फणस यांच्यासारख्या बागांना हेक्टरी 50 हजारांपर्यंत मदत देण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता वाढीव मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकणातील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत म्हणून प्रतिकुटुंब कपड्यांसाठी आणि भांड्यांसाठी 5 हजार रुपये दिले जातील.
उद्धवस्त झालेल्या झोपड्यांसाठी 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. .
प्रतिकुटुंब पाच लीटर रॉकेल दिलं जाईल तसंच भिजलेले धान्य बदलून देणार आहेत.
कोकणात मुख्यतः पत्र्यांच्या घरांचं नुकसान झालं आहे. त्यांना स्लॅबची घरं देता येतील का याबाबत विचार करण्यात येत आहे, असं पवार म्हणाले.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments